घरक्रीडामुरली विजय खेळणार कौंटी क्रिकेट

मुरली विजय खेळणार कौंटी क्रिकेट

Subscribe

भारताचा सलामीवीर मुरली विजयला इंग्लंडविरुद्ध सुरु असलेल्या मालिकेच्या पाहिल्या दोन सामन्यातील खराब प्रदर्शनानंतर संघातील स्थान गमवावे लागले होते. आता तो इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट खेळणार आहे.

भारताचा सलामीवीर मुरली विजयला इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटींनंतर संघातून वगळण्यात आले होते. आता इंग्लंडमध्येच कौंटी क्रिकेट खेळून भारतीय संघात पुनरागमन करण्याचा प्रयत्न करणार आहे. तो एसेक्स या कौंटीकडून या इंग्लिश मोसमातील शेवटचे तीन सामने खेळणार आहे. यापैकी पहिला सामना १० सप्टेंबरपासून नॉटिंगहॅम संघाविरुद्ध होणार आहे.

इंग्लंडविरुद्ध खराब प्रदर्शन 

मुरली विजयला इंग्लंडविरुद्धच्या दोन कसोटींनंतर संघातून वगळण्यात आले होते. त्याने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील पहिल्या कसोटीत २० आणि ६ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या सामन्याच्या दोन्ही डावांत त्याला भोपळाही फोडता आला नाही. त्यामुळे त्याला संघातून वगळून चेतेश्वर पुजाराला संघात स्थान दिले गेले. तर तिसऱ्या कसोटीनंतर त्याला भारतीय चमूतही जागा मिळाली नाही. त्याच्या जागी मुंबईकर सलामीवीर पृथ्वी शॉची भारतीय चमूत निवड करण्यात आली होती.
सौजन्य – cricinfo

पुनरागमन ठरणार अवघड

विजय कौंटी क्रिकेट जरी खेळणार असला तरी त्याला भारतीय संघात परतण्यासाठी बरेच प्रयत्न करावे लागतील. भारतीय संघात सध्या शिखर धवन आणि लोकेश राहुल हे मुख्य सलामीवीर आहेत. तर युवा पृथ्वी शॉ आणि मयांक अगरवाल हे दोघेदेखील भारतीय संघाचे दार ठोठावत आहेत. त्यातच विजयचे वय ( ३४ वर्ष ) लक्षात घेता भारतीय निवडकर्त्यांचे आपल्याकडे पुन्हा लक्ष वळवण्यासाठी त्याला बऱ्याच धावा कराव्या लागणार आहेत.
सौजन्य – DNA
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -