घरमनोरंजनकास्टिंग काऊच प्रकरणातील 'त्या' अभिनेत्रीचा सचिन तेंडुलकरवर आरोप

कास्टिंग काऊच प्रकरणातील ‘त्या’ अभिनेत्रीचा सचिन तेंडुलकरवर आरोप

Subscribe

तेलुगू सिनेसृष्टीतील अभिनेत्यासंबंधी कास्टिंग काऊचबाबत बोलणारी अभिनेत्री श्री रेड्डीने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे.

तेलुगू सिनेसृष्टीतील अभिनेत्यासंबंधी कास्टिंग काऊचबाबत बोलणारी तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. तिने माजी क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. तिने स्वतःच्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केला असून त्यावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. श्री रेड्डी फेसबुकवर पोस्ट शेअर करून त्यात लिहिले आहे की, सचिन तेंडुलकरचे एका मुलीसोबत प्रेमसंबंध होते. तिच्या या पोस्टवर अद्याप तरी सचिनकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र त्याच्या चाहत्यांनी श्री रेड्डी या पोस्टवरून चांगलेच सुनावले आहे.

- Advertisement -

कास्टिंग काऊचरवर बिनधास प्रतिक्रिया देणारी ही तेलुगू अभिनेत्रीने आता सचिनवर निशाणा साधला आहे. रेड्डीने म्हटले आहे की, सचिन तेंडुलकर नावाचा एक रोमॅंटिक मुलगा जेव्हा हैदराहबादला आला तेव्हा तो एका चार्मिंग मुलीला भेटला आणि तिच्यासोबत त्याचे सूत जुळले. हाय प्रोफाइल चमुंडेश्वर स्वामी बिचौलिया होता. महान व्यक्ती चांगल खेळतात. म्हणजे चांगल रोमान्स करतात.

या अभिनेत्रीने आपल्या पोस्टमध्ये ज्या मुलीचा उल्लेख केला आहे. ती टॉलीवूडची अभिनेत्री चार्मी कौर असल्याचे सांगितले जाते. श्री रेड्डीच्या या खलबळजनक पोस्टवर सचिनच्या चाहत्यांनी संताप व्यक्त करणाऱ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने आपल्या कमेंटमध्ये लिहिले आहे की, आम्ही सचिन यांचा आदर करतो आणि कायम करत राहणार. तू तुझी घाणेरडी पब्लिसिटी बंद कर. तर एकाने असे म्हटले आहे की, सचिन क्रिकेटचा देव आहे आणि त्यांच चारित्र्यही चांगलचं आहे. मित्रांनो प्लीज या महिलेच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका.

- Advertisement -

श्री रेड्डीने टॉपलेस होऊन तेलुगू चित्रपटसृष्टीत होणाऱ्या कास्टिंग काऊचच्या विरोधात निषेध व्यक्त केला होता. त्यांनी आरोप केला होता की, येथील कलाकारांना कामं न देता मुंबईच्या कलाकारांना काम दिली जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -