घरमहाराष्ट्र'हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या...'; आनंद शिंदेंचा फडणवीसांना टोला

‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या…’; आनंद शिंदेंचा फडणवीसांना टोला

Subscribe

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सरकार बदलायचं माझ्यावर सोडा, असं विधान केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी देखील याला उत्तर दिलं आहे. यात आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना गाण्यातून उत्तर दिलं आहे. ‘हे पवार साहेबांचं सरकार हाय, तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय’ असा थेट इशाराच फडणवीस यांना दिला आहे.

आनंद शिंदे हे त्यांचे दिवगंत मित्र भारत भालके यांचे चिरंजीव आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचारासाठी सोमवारी मंगळवेढ्यात आले होते. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता ‘त्यांना सांगायचंय मला’ असे म्हणत फडणवीसांच्या वक्तव्याचा एका गाण्याच्या माध्यमातून समाचार घेतला.

- Advertisement -

“तुम्ही चिडवताय,
आम्ही चिडणार नाय.
तुम्ही लय काय करताय,
तसं काय घडणार नाय.
तुम्ही रडवताय
पण आम्ही रडणार नाय.
हे पवार साहेबांचं सरकार हाय,
तुमच्या बापाच्यानं पण पडणार नाय”

या ओळींमधून आनंद शिंदे यांनी देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे. आनंद शिंदे यांच्या या गाण्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटाने उपस्थितांनी प्रतिसाद दिला. याशिवाय, यावेळी धुरळा चित्रपटातील ‘नजर धारदार माणूस दमदार’ हे गाणे गात शिंदे यांनी भगीरथ भालके यांच्या विजयाचा विश्वासही व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारही उपस्थित होते.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -