घरक्रीडाIPL 2021 : मॅक्सवेलची कामगिरी पाहून RCB चे प्रशिक्षक खुश, म्हणाले...

IPL 2021 : मॅक्सवेलची कामगिरी पाहून RCB चे प्रशिक्षक खुश, म्हणाले…

Subscribe

बंगळुरूने मॅक्सवेलला १४.२५ कोटी रुपयांत खरेदी केले होते.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बुधवारी झालेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) सामन्यात सनरायजर्स हैदराबादला पराभूत केले. हा बंगळुरूचा यंदाच्या मोसमातील सलग दुसरा विजय ठरला. बंगळुरूच्या या विजयात ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलने महत्वाची भूमिका बजावली. त्याने ४१ चेंडूत ५९ धावांची खेळी करत सामनावीराचा पुरस्कार पटकावला. मॅक्सवेलला आयपीएलच्या मागील मोसमात किंग्स इलेव्हन पंजाबकडून खेळताना चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. असे असतानाही बंगळुरूने त्याला १४.२५ कोटी रुपयांत खरेदी केले. बंगळुरूने दाखवलेला हा विश्वास मॅक्सवेलने सार्थ ठरवल्याचा प्रशिक्षक सायमन कॅटीच यांना आनंद आहे.

कौतुकास्पद कामगिरी 

मॅक्सवेलमध्ये आता अधिक परिपक्वता दिसून येत आहे. त्याच्या खेळात खूप सुधारणा झाली आहे. हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दुसऱ्या बाजूने विकेट पडत असताना मॅक्सवेलने संयम राखला. त्याने परिस्थिती ओळखली आणि त्यानुसार खेळ केला. आमच्यासाठी अखेरच्या षटकांत वेगाने धावा होणे गरजेचे होते. मॅक्सवेलने सुरुवातीला वेळ घेत नंतर फटकेबाजी केली. या सामन्यातील त्याची कामगिरी कौतुकास्पद होती, असे कॅटीच म्हणाले.

- Advertisement -

त्याच्या अनुभवाचा फायदा

मॅक्सवेलला मागील मोसमात १३ सामन्यांमध्ये केवळ १०८ धावा करता आल्या होत्या. यंदा मात्र त्याने पहिल्या दोन सामन्यांतच ९८ धावा फटकावल्या आहेत. मॅक्सवेल आमच्यासाठी महत्वाची भूमिका बजावतो. तो क्षेत्ररक्षणाची रचना करण्यासाठी कर्णधार विराट कोहलीला मदत करतो. त्याला सल्ले देतो. त्यामुळे त्याच्या अनुभवाचा आम्हाला फायदा होत असल्याचे कॅटीच यांनी नमूद केले.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -