घरताज्या घडामोडीCorona Vaccination :आदित्य ठाकरेंनी मोडली शिस्त, नंतर ट्विट्स डिलीट

Corona Vaccination :आदित्य ठाकरेंनी मोडली शिस्त, नंतर ट्विट्स डिलीट

Subscribe

मोफत लसीकरणाच्या धोरणावर केलेले ट्विट्स डिलिट

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना लस देण्याच्या निमित्ताने महाराष्ट्रातील नागरिकांना सुरक्षिततेच्या दृष्टीने हे पाऊस असल्याचे स्पष्ट केले आहे. याचाच भाग म्हणून आम्ही राज्यात लसीकरणाचा मोहीम हाती घेतली आहे. येत्या दिवसांमध्ये राज्यातील नागरिकांना मोफत अशा स्वरूपात लस देण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटच्या माध्यमातून दिली. लस देणे हा आम्ही पर्याय म्हणून पाहत नाही. पण लस पुरवठा करणे ही सध्याची आमची सरकार म्हणून सर्वात महत्वाची जबाबदारी आहे. आपल्या महाराष्ट्रातील नागरिकांचे कोरोनापासून रक्षण करणे हे सरकार म्हणून आमच्या प्राधान्यक्रमावर आहे असे ट्विट आदित्य ठाकरे यांनी केले. सरकारच्या लसीकरण मोहीमवर भाष्य करणाऱ्या या दोन्ही ट्विट्स आदित्य ठाकरे यांच्याकडून डिलिट करण्यात आले.

राज्यातील लसीकरण मोहीम सुरळीतपणे सुरू रहावी यासाठी राज्य सरकार सगळे प्रयत्न करत आहे. त्यामध्ये लस खरेदीची प्रक्रिया तातडीने कशा पद्धतीने राबवता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. परिणामी लसीकरण मोहीमेसाठी पुरेशा लसींचा साठा उपलब्ध होऊ शकेल. त्याचा फायदा हा नागरिकांना लस घेण्यासाठीही होणार आहे. म्हणूनच राज्यातील सर्व नागरिकांचे लसीकरण होतानाच ते मोफत अशा स्वरूपात व्हावे असा आमचा प्रयत्न असणार आहे. या लसीकरण मोहीमेचे व्यवस्थापन अतिशय सुलभ आणि वेगवान पद्धतीने व्हावे यासाठीच सरकारी यंत्रणा कामाला लागली आहे. कोरोनाच्या संकटात सुरक्षित असणारा महाराष्ट्र हा सुरक्षित भारताकडे जाणारा मार्ग असल्याचेही आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच इतर राज्यांसाठीही हाच सुरक्षेचा मार्ग हा महत्वाचा असणार आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

ट्विट डिलिट केल्याचा खुलासा

आदित्य ठाकरे यांनी डिलिट केलेल्या ट्विटबाबत खुलासा करताना स्पष्ट केले की, महाराष्ट्राच्या अधिकृत लसीकरण धोरणाबाबत कोणताही गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मी ट्विट डिलिट करत आहे. महाराष्ट्राच्या लसीकरणाची मोहीम ही वेगवान, मुबलक आणि सर्वसमावेशक असेल असेही त्यांनी नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच लसीकरणाबाबतचे धोरण हे सक्षम समितीमार्फत जाहीर करण्यात येईल. त्यामुळेच लसीकरणाच्या मोहीमेसाठीचे नागरिकांसाठीचे धोरण लवकरच स्पष्ट होईल असेही त्यांनी नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

- Advertisement -

आदित्य ठाकरे यांच्याआधी दुपारीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी जनतेला मोफत लस पुरवणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतरच आदित्य ठाकरे यांचीही प्रतिक्रिया आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या संक्रमणाविरोधात लढाई देणारे आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा त्यांच्या कामात सक्रीय झाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी कोरोनावर मात करून पुन्हा एकदा ते आपले नियमित काम करू लागले आहेत. आदित्य ठाकरे यांच्या पाठोपाठच रश्मी ठाकरे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. तर ठाकरे कुटूंबीयांपैकी एक म्हणजे अमित ठाकरे यांनीही कोरोनाची लागण काही दिवसांपूर्वी झाली होती. अमित ठाकरेंनीही आता कोरोनावर मात केली आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -