घरताज्या घडामोडीराज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

राज्याचे माजी मंत्री संजय देवतळे यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन

Subscribe

कोरोनावरील उपचारादरम्यान आला ह्रदयविकाराचा झटका

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव तीव्र झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकप्रतिनिधींना आपले प्राण गमवावे लागले आहेत. आज राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते संजय देवतळे यांचे निधन झाले आहे. संजय देवतळे यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर नागपूरमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना ह्रदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले आहे. देवतळे यांच्या निधनाने जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. राज्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. देवतळे यांच्या घरातील एका सदस्याला कोरोनाची लागण झाली होती. यादरम्यान संजय देवतळे यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

चंद्रपुर जिल्ह्याचे पालकमंत्री व भाजप नेते संजय देवतळे कोरोनावर गेल्या ६ दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत होते. एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. देवतळे यांच्या कुटुंबातील सदस्याला प्रथम कोरोनाची लागण झाली होती. यानंतर घरातील सर्व सदस्यांची कोरोना चाचणी केली असता देवतळे यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

- Advertisement -

संजय देवतळे यांची राजकीय कारकिर्द

संजय देवतळे हे ४ वेळा आमदार म्हणून वरोरा विधानसभा मतदारसंघातून निवडून आले त्यावेळी ते काँग्रेस पक्षात होते. त्यांच्यावर जिल्ह्याची पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. त्यांच्यावर पर्यावरण मंत्रिपदाचा कार्यभार देण्यात आला होता. २०१४च्या विधानसभा निवडणूकीमध्ये काँग्रेसला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला. परंतु त्यांना या निवडणूकीमध्ये हार पत्करावी लागली होती. यानंतर २०१९ ची निवडणूक शिवसेनेच्या तिकिटावर लढले होते. यानंतर पुन्हा त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -