घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: कोरोनाचा हाहाकार सुरूच! राज्यात ६६ हजार १५९ नवे रुग्ण 

Maharashtra Corona Update: कोरोनाचा हाहाकार सुरूच! राज्यात ६६ हजार १५९ नवे रुग्ण 

Subscribe

राज्यात आज ६८,५३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाचा धोका कायम असून रुग्णांच्या संख्येत चढ-उतार पाहायला मिळत आहे. बुधवारी राज्यात ६३ हजार नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले होते. गुरुवारी हा आकडा पुन्हा वाढलेला दिसला. गुरुवारी ६६ हजार १५९ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ३९ हजार ५५३ झाली असून अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ६ लाख ७० हजार ३०१ वर पोहोचली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,६८,१६,०७५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४५,३९,५५३ (१६.९३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४१,१९,७५९ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून ३०,११८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात ७७१ कोरोनाबाधितांचा मृत्यू

राज्यात आज ७७१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आतापर्यंत ६७ हजार ९८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.५० टक्के एवढा आहे. आज ६८,५३७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३७,९९,२६६ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६९ टक्के एवढे झाले आहे.

- Advertisement -

मुंबईत ४१७४ नवे रुग्ण 

मुंबईत गुरुवारी ४१७४ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे आता एकूण रुग्णसंख्या ६ लाख ४४ हजार ५८३ इतकी झाली आहे. तसेच गुरुवारी कोरोनामुळे ८२ जणांचा मृत्यू झाला. मुंबईत आतापर्यंत एकूण १३ हजार ०३६ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -