घरCORONA UPDATELive Update: पुण्यात २४ तासांत ११,६६१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ, १५९ जणांचा मृत्यू

Live Update: पुण्यात २४ तासांत ११,६६१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ, १५९ जणांचा मृत्यू

Subscribe

पुण्यात गेल्या २४ तासांत ११ हजार ६६१ नवे कोरोनाबाधित आढळले असून १५९ मृत्यूची नोंद झाली आहे. तर ९ हजार ५६६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. आता पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या ८ लाख ६० हजार ८४४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १३ हजार ३९६ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ४८ हजार ८७० कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या ९८ हजार ७४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

गेल्या २४ तासांत राज्यात ५६ हजार ६४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६६९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७ लाख २२ हजार ४०१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७० हजार २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर वाचा 

- Advertisement -

गेल्या २४ तासांत मुंबईत ३ हजार ६७२ नव्या कोरोनाबाधित आढळले असून ७९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तप ५ हजार ५४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सविस्तर वाचा 


कोरोना संसर्ग पाहता इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानं शुक्रवारी अत्यंत महत्त्वाची घोषणा केली. ज्याअंतर्गत शासनाकडून इस्रायलमध्ये येणाऱ्या नागरिकांवर कठोर निर्बंध लावण्यात आले आहेत. भारतासह कोरोनाचा अतीव धोका असणाऱ्या सात देशांत प्रवास करण्यास इस्रायलनं बंदी घातली आहे.


कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे ओडिशात 5 ते 15 मे पर्यंत लॉकडाऊन घोषित


कोरोनाचा हैदोस! देशात २४ तासांत ३ लाख ९२ हजार ४८८ नवे रुग्ण आढळून आले असून मृतांचा आकडा ३६८९ वर पोहचला आहे.


कोरोनाचा दुसऱ्या लाटेने देशात कहर केला आहे. यात अनेक राज्यांमध्ये आज ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांसाठी झगडावे लागत आहे.. याचपार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तज्ज्ञांशी महत्त्वपूर्ण बैठक घेणार आहे. सकाळी ९.३० वाजता या बैठकीला सुरुवात होईल. या बैठकीत देशातील ऑक्सिदन साठा आणि इतर अत्यावश्यत आरोग्य सेवा, औषधांसंदर्भात आढावा घेतला जाणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -