घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

Maharashtra Corona Update: दिलासादायक! राज्यात नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट

Subscribe

राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे राज्यात कठोर निर्बंध लादण्यात आले आहेत. पण याचा परिणाम कुठेतरी चांगला होताना दिसत आहेत. आज राज्यातील नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ५६ हजार ६४७ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ६६९ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ४७ लाख २२ हजार ४०१वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ७० हजार २८४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ६ लाख ६८ हजार ३५३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

राज्यात आज दिवसभरात ५१ हजार ३५६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आजपर्यंत एकूण ३९ लाख ८१ हजार ६५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८४.३१ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे. आज नोंद झालेल्या एकूण ६६९ मृत्यूंपैकी ३५० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १५३ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित १६६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे १६६ मृत्यू, पुणे-५२, ठाणे-२३, नाशिक-२०, यवतमाळ-१३, नांदेड-९, भंडारा-८, हिंगोली-८, रायगड-६, जळगाव-४, लातूर-४, चंद्रपूर-३, नागपूर-३, सांगली-३, वाशिम-३, औरंगाबाद-२, सोलापूर-२, जालना-१, परभणी-१ आणि सातारा-१ असे आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ७६ लाख ५२ हजार ७५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७ लाख २२ हजार ४०१ (१७.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९ लाख ९६ हजार ९४६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७ हजार ७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – Mumbai Corona Update: Corona ‘ब्रेक द चैन’ मोहिमेत मुंबईकर यशस्वी! २४ तासांत ५,५४२ रुग्ण कोरोनामुक्त


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -