घरनवी मुंबईकोविड योद्ध्यांच्या मदतीला पुन्हा एकदा टाटा, दोन हजार डॉक्टरांच्या जेवणाची घेतली जबाबदारी

कोविड योद्ध्यांच्या मदतीला पुन्हा एकदा टाटा, दोन हजार डॉक्टरांच्या जेवणाची घेतली जबाबदारी

Subscribe

कोरोनाविरुद्धच्या लढाईत डॉक्टर्स, नर्स हे प्रमुख योद्धे आहेत. या कोविड योद्ध्यांच्या मदतीला पुन्हा एकदा रतन टाटा धावून आले आहेत. नवी मुंबईतील महापालिकेच्या सुमारे १४ कोविड सेंटरमध्ये दोन हजार डॉक्टर कोरोना रूग्णांची सेवा करत आहेत. या डॉक्टरांच्या जेवणाची जबाबदारी टाटा समूहाने घेतली आहे. या डॉक्टरांना टाटा समूहाच्या ताज हॉटेलमधून दरदिवशी दोन वेळचे जेवण देण्यात येणार आहे. याची सुरुवात आज शनिवारपासून झाली आहे.

कोरोनाच्या लढाईत डॉक्टर्स, नर्स स्वत:चा जीव धोक्यात टाकून रुग्णांवर उपचार करत आहेत. नवी मुंबईमधील विविध कोविड सेंटरमध्ये काम करणाऱ्या सुमारे दोन हजार डॉक्टरांची आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था चांगल्या ठिकाणी व्हावी यासाठी शिवसेनेचे खासदार राजन विचारे आणि जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे प्रयत्न करत होते. त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे टाटा समूहाच्या ताज हॉटेलमध्ये नवी मुंबईतील दोन हजार डॉक्टरांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

- Advertisement -

या डॉक्टरांना टाटा समूहाच्या ताज हॉटेलमधून दरदिवशी दोन वेळचे जेवण देण्यास आजपासून शुभारंभ करण्यात आला आहे. डॉक्टरांसाठी जेवण घेऊन आलेल्या ताज हॉटेलच्या गाडीचे शिवसेनेच्या वतीने स्वागत करण्यात आले. यावेळी शिवसेनेचे खासदार राजन विचारे, जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हाप्रमुख संतोष घोसाळकर, दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने, उपशहर प्रमुख सोमनाथ वासकर, मनोज इसवे, एकनाथ दुखंडे, जितेंद्र कांबळी, महेंद्र धुमाळ, श्रीकांत हिंदळकर, विभागप्रमुख विजय चांदोरकर, दर्शन भगणे, ललित बुंदेला उपविभागप्रमुख संदीप पवार, प्रकाश ओंबले, गजानन घाग आदि उपस्थित होते.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -