घरताज्या घडामोडीCoronavirus: जेलमध्ये कोरोनाचा विस्फोट; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, कैद्यांना पेरोलवर सोडण्याचा आदेश

Coronavirus: जेलमध्ये कोरोनाचा विस्फोट; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, कैद्यांना पेरोलवर सोडण्याचा आदेश

Subscribe

या कैद्यांना ९० दिवसांसाठी सोडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने भयानक परिस्थिती निर्माण केली आहे. दिवसाला ४ लाखांहून अधिक नवे कोरोनाबाधित सापडत असून आज ४ हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व कडक निर्बंध लावूनही कोरोनाची परिस्थितीत सुधारणा दिसत नाही आहे. दरम्यान यामध्ये चार भिंतींच्या आतमध्ये राहणारे लोकांना कोरोनाचा संसर्ग होत आहे. देशातील सर्व तुरुंगातील कैद्यांना कोरोना लागण होत आहे. एवढेच नाहीतर काही कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यादरम्यान तुरुंगातील कैद्यांच्या परिस्थितीच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय घेतला आहे. तुरुंगातून कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण आदेश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘गेल्यावर्षीच्या निर्देशाचे राज्याने पालन करावे. ज्या कैद्यांना गेल्या वर्षी सोडले होते, त्यांची पुन्हा सुटका करावी. ज्यांना पेरोल मिळाले होते, त्यांना ९० दिवसांसाठी सोडावे. तसेच महत्त्वाच्या प्रकरणासंबंधितच अटक केली पाहिजे.’ सर्वोच्च न्यायालयाने गेल्यावर्षी नियुक्त केलेल्या कमेटीला सांगितले की, ‘सशर्त सुटण्यास पात्र असलेल्या नव्या कैद्यांनाही त्यांच्या सुटकेसाठीच्या विचारात घ्यावे.’

- Advertisement -

विशेष म्हणजे जेव्हा तुरुंगात कैद्यांना कोरोनाची बाधा अधिक होऊ लागली आणि काही कैद्यांच्या मृत्यूची बातम्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय घेतला. यापूर्वी सर्वोच्च न्यायालय कैद्यांना जामीनावर सोडण्याचा विचार करत होते. लवकरच याबाबत आदेश दिला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले होते. सुनावणीदरम्यान सीजीआय एन वी रमना म्हणाले की, ‘सध्याची परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे. कोरोनाची दुसरी लाट अधिक भयावह आहे.’ दरम्यान गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने काही प्रवर्गातील कैद्यांना जामीनावर सोडण्याचे आदेश दिले होते.

यापूर्वी देशातील सर्वात मोठे जेल तिहाड जेलमधील कैद्यांना पेरोलवर सोडण्याची तयारी झाली आहे. शुक्रवारी कोरोना केसेस वाढल्यामुळे तिहाड जेल प्रशासनाने जवळपास ४ हजार कैद्यांना पेरोलवर सोडण्याचा निर्णय घेतला. तिहाड जेलमधून या कैद्यांना ९० दिवसांच्या जामीनावर सोडले जाईल. तिहाड जेलमध्ये १० हजार २६ कैद्यांची क्षमता आहे, परंतु सध्या १९ हजार ६७८ कैदी बंद आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३००हून अधिक कैदी आणि १०० हून अधिक कर्मचारी कोरोना संक्रमित झाले आहेत. एवढेच नाहीतर गेल्या आठवड्यात ५ कैद्यांचा कोरोनामुळे मृत्यू झालेच समोर आले आहे. त्यामुळे तिहाड जेल प्रशासनाने हा निर्णण घेतला आहे. जेणेकरून जेलमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे पालन होऊ शकेल.

- Advertisement -

हेही वाचा – चिंताजनक! देशात वायु प्रदूषण वाढल्यास कोरोना मृतांची संख्या ५.७ टक्क्यांनी वाढेल- रिसर्च


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -