घरताज्या घडामोडीयुरेनियम प्रकरणाचा तपास आता NIA कडे

युरेनियम प्रकरणाचा तपास आता NIA कडे

Subscribe

महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथ (एटीएस) ने जप्त केलेल्या ७ किलो युरेनियम प्रकरणचा तपास आता नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सी (NIA) ने हाती घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणातील यापुढील तपास आता एनआयए करणार हे स्पष्ट झाले आहे. या संपुर्ण प्रकरणात युरेनियमचा संबंध आल्यानेच आता यापुढील तपास एनआयए करणार आहे. एटीएसने काही दिवसांपूर्वीच गोवंडी भागातून स्क्रॅपमधून मोठ्या प्रमाणात युरेनियम जप्त केले होते. एटीएसने जप्त केलेल्या युरेनियमची किंमत २१ कोटी ३० लाख इतकी आहे. एटीएसने जिगर पांड्या आणि अबू ताहीर यांना आधीच अटक केली आहे. शासनाने प्रतिबंधित पदार्थ म्हणून निर्देशित केलेले नैसर्गिक युरेनियम बाळगल्या प्रकरणी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने या दोघांनाही १२ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

कसा रचला सापळा ?

जिगर पांड्या आणि अबु ताहीर अफझल चौधरी हे दोघेही गेल्या वर्षभरापासून युरेनियमसाठी ग्राहक शोधत होते. याचा वापर कोणकोणत्या क्षेत्रात होतो हेदेखील दोघांनी गुगलवर शोधून काढले होते. त्यामुळे आपल्याकडे असलेल्या ७ किलो युरेनियम विकण्यासाठी ग्राहकाचा शोध यांनी सुरू केला. पण दरम्यानच्या कालावधीत या संशयास्पद गोष्टीची माहिती ही एटीएसच्या अधिकाऱ्यांना लागली. त्यानुसार एटीएसचे पोलिस निरीक्षक संतोष भालेकर यांच्या नेतृत्वातील टीमने या प्रकरणाचा सापळा लावला. ग्राहक म्हणून खुद्द संतोष भालेकर हेच युरेनियम खरेदीसाठी गेले होते. त्यामुळेच या संपुर्ण प्रकरणाचा पर्दाफाश झाला. त्यानंतर चौकशीमध्ये युरेनियम हे गोवंडीच्या मंडाला परिसरात ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात ७ किलो १०० ग्रॅमचे युरेनियम ताब्यात घेण्यात आले आहे.

- Advertisement -

हे युरेनियम याआधीच म्हणजे १४ फेब्रुवारीलाच हस्तगत करण्यात आले आहे. पण या प्रकरणात बीएआरसीमार्फत चौकशी सुरू होती. पण बीएसआरसीच्या अहवालात हे नैसर्गिक पद्धतीचे युरेनिअम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानंतरच अहवाल प्राप्त झाल्यानंतर बीएसआरसीच्या प्रादेशिक संचालक दक्षिण प्रादेशिक विभाग, अटॉमिक मिनरल्स डायरेक्टोरेट फॉर एक्स्प्लोरेशन एण्ड रिचर्स, अॅटोमिक एनर्जीच्या एका नागपुरच्या अधिकाऱ्याने या प्रकरणात तक्रार केल्यानंतर गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर अॅटोमिक एनर्जी कायदा १९६२ अन्वये एटीएस काळाचौकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाने प्रतिबंधित पदार्थ म्हणून निर्देशित केलेले नैसर्गिक युरेनियम बाळगल्या प्रकरणी जिगर पंड्या, अबु ताहीर अफझल चौधरी याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या युरेनियमचे वजन ७ किलो असून किंमत २१ कोटी ३० लाख रूपये इतकी आहे. हे युरेनियम धोकादायक असून याचा किरणोत्सर्ग मानवी जीवनास हानीकारक आहे.

या गुन्ह्यामध्ये आरोपी असलेल्यांपैकी एक अबु ताहिरने युरेनियम कुठे सापडलले याचा कबुली जबाब दिला आहे. हे युरेनियम सहा वर्षांपूर्वीच सापडल्याचा खुलासा या ताहिरने केला आहे. कुर्ला स्क्रॅप मर्चंट असोसिएशन लोहार गल्लीतील गाळ्यात, मंडाला, गोवंडी येथे हे युरेनियम ठेवल्याची कबुली आरोपीने दिली. माझ्या वडिलांना हे ७ किलो वजनाचे युरेनियम सहा वर्षांपूर्वीच सापडले होते. आमच्या स्क्रॅपच्या व्यवसाया दरम्यान हे युरेनियम आढळले होते. पण तेव्हा सापडलेली गोष्ट युरेनियम आहे का ? याबाबत माहिती नव्हती असेही त्याने सांगितले. गेल्या वर्षभरात लॉकडाऊनच्या काळात आम्ही या गोष्टीचा अभ्यास केला तेव्हा आम्हाला ही गोष्ट युरेनियम असल्याचे कळाले. त्यानंतर या गोष्टीचा कशासाठी वापर होतो याचाही आम्ही शोध घेतला. आम्ही ही गोष्ट खरेदी करणारे ग्राहक शोधायला लागलो अशीही कबुली त्या दोघांनी दिली आहे. हे दोघेही तरूण उच्च शिक्षित असून या युरेनियमचे तुकडे विकण्यासाठी त्यांनी ग्राहकांचा शोध सुरू केल्यानंतर या प्रकरणातला हा मोठा खुलासा झाला.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -