घरक्रीडाOlympics : ८० टक्के जपानी नागरिकांचा टोकियो ऑलिम्पिकला विरोध! कोरोना वाढण्याची भीती

Olympics : ८० टक्के जपानी नागरिकांचा टोकियो ऑलिम्पिकला विरोध! कोरोना वाढण्याची भीती

Subscribe

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे.  

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, यंदा होणाऱ्या टोकियो ऑलिम्पिकला (Tokyo Olympics) जपानी नागरिकांचा विरोध दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनाच्या चौथ्या लाटेमुळे सध्या जपानमधील परिस्थिती चिंताजनक होत असून आरोग्य यंत्रणेवर खूप ताण आहे. त्यातच ऑलिम्पिक झाल्यास टोकियोसारख्या मोठ्या शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची स्थानिक नागरिकांना भीती आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी टोकियो ऑलिम्पिक रद्द करण्यासाठी याचिका करण्यात आली होती, ज्यावर साडे तीन लाखांहून अधिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या होता. आता ऑलिम्पिकबाबतचा आणखी एक सर्व्हे घेण्यात आला असून ८० टक्के जपानी नागरिकांनी या स्पर्धेला विरोध दर्शवला आहे.

१४ टक्के लोकांचा स्पर्धा घेण्याला पाठिंबा

मागील शुक्रवारी जपानच्या काही भागांमध्ये आरोग्य आणीबाणीचा कालावधी वाढवण्यात आला होता. त्यानंतर ‘द असाही शिंबन’ या जपानमधील वृत्तपत्राने टोकियो ऑलिम्पिकच्या आयोजनाबाबत एक सर्व्हे घेतला. या सर्व्हेनुसार, ४३ टक्के जपानी नागरिकांनी ऑलिम्पिक रद्द करण्याला, तर ४० टक्के नागरिकांनी ऑलिम्पिक पुन्हा पुढे ढकलण्याला पाठिंबा दर्शवला आहे. केवळ १४ टक्के लोकांचा स्पर्धा घेण्याला पाठिंबा आहे.

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती

तसेच जपानमधील क्योडो न्यूजच्या सर्व्हेमध्ये तब्बल ५९.७ टक्के नागरिकांचा थेट ही स्पर्धा पूर्णपणे रद्द करण्याला पाठिंबा आहे. या सर्व्हेनुसार, जगभरातील खेळाडू आणि अधिकारी जपानमध्ये आल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती ८७.७ टक्के नागरिकांना वाटत आहे. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) आणि आयोजकांवरील दबावही वाढताना दिसत आहे. कोरोनामुळे एका वर्षाने पुढे ढकलण्यात आलेली टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा यंदा २३ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत पार पडणार आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -