घरक्रीडानिवृत्तीचा निर्णय अंतिमच! एबी डिव्हिलियर्सचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनास नकार

निवृत्तीचा निर्णय अंतिमच! एबी डिव्हिलियर्सचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनास नकार

Subscribe

मागील काही महिने डिव्हिलियर्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत चर्चा सुरु होती.

दक्षिण आफ्रिकेचा महान फलंदाज एबी डिव्हिलियर्सने मे २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. मात्र, त्यानंतरही तो इंडियन प्रीमियर लीग (IPL) आणि जगभरातील विविध टी-२० स्पर्धांमध्ये खेळताना दमदार कामगिरी करत होता. तसेच त्याच्या निवृत्तीनंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघालाही फारसे यश मिळवता आलेले नाही. त्यामुळे मागील काही महिने डिव्हिलियर्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पुनरागमनाबाबत चर्चा सुरु होती. डिव्हिलियर्सने याबाबत दक्षिण आफ्रिकेचा मुख्य प्रशिक्षक मार्क बाऊचरशी संवाद साधला होता. मात्र, आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास नकार दिला आहे.

निवृत्तीचा निर्णय अंतिमच

‘आम्ही एबी डिव्हिलियर्सशी चर्चा केली. या चर्चेअंती डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय अंतिम असल्याचे आम्हाला सांगितले,’ असे वेस्ट इंडिज आणि आयर्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेसाठी संघाची घोषणा करताना क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने स्पष्ट केले. नुकत्याच झालेल्या आयपीएल स्पर्धेत डिव्हिलियर्सने अप्रतिम खेळ केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळताना त्याने ७ सामन्यांमध्ये ५२ च्या सरासरीने आणि १६४ च्या स्ट्राईक रेटने २०७ धावा फटकावल्या होत्या.

- Advertisement -

पुनरागमनाचे दिले होते संकेत  

आयपीएल स्पर्धेदरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याचे संकेत दिले होते. यंदा टी-२० वर्ल्डकपमध्ये खेळण्याचा विचार करत असल्याचे तो म्हणाला होता. दक्षिण आफ्रिकेच्या संघात सध्या बरेच युवा खेळाडू असल्याने त्यांना अनुभवी खेळाडूंची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे डिव्हिलियर्स संघात परतण्याचा विचार करेल अशी दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट बोर्डाला आशा होती. परंतु, आता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यास नकार दिला आहे.

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -