घरमनोरंजनपंगा गर्ल कंगनाची कोरोनावर मात, कंगनाची कोरोना चाचणी आली नेगेटिव्ह

पंगा गर्ल कंगनाची कोरोनावर मात, कंगनाची कोरोना चाचणी आली नेगेटिव्ह

Subscribe

सर्व हितचिंतकांचे आभार तसेच प्रेम" कंगनाने या पोस्ट द्वारे आपल्या विरोधकांना देखील टोला लगावला आहे. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हयरल होत आहे.

बॉलिवूडची पंगा गर्ल कंगना रनौत आपल्या प्रोफेशनल तसेच खाजगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेच्या झोतात असते. नुकतच काही दिवसांपूर्वी कंगनाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती तिने दिली होती. पण आता कंगनाने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असल्याचे कंगनाने सोशल मीडिया अकाऊंट द्वारे संगितले आहे. कंगनाने 5 मिंटांचा एक विशेष व्हिडिओ पोस्ट करून कोरोनाला कशा प्रकारे हरवल असल्याचे  आहे. ” सगळ्यांना हॅलो,माझी कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. मी तुम्हा सगळ्यांशी काही बोलू इच्छित आहे मी कशा प्रकारे व्हायरसचा सामना केला. मला सांगण्यात आले आहे की या व्हायरसच्या फॅन कल्ब ना नाराज नको करूस. हे अगदी खरं आहे की कोरोना बद्दल काही बोलल्यास अनेक लोकं नाराज होतात. सर्व हितचिंतकांचे आभार तसेच प्रेम” कंगनाने या पोस्टद्वारे आपल्या विरोधकांना देखील टोला लगावला आहे. कंगनाची ही पोस्ट सोशल मीडियावर तूफान व्हयरल होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपूर्वी कंगनाने इंस्टाग्रामवर कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याचे संगितले होते. मात्र तिने पोस्ट मध्ये कोरोना हा किरकोळ आजार असल्याचे लिहले होते. या पोस्टवर कारवाई करत इंस्टाग्राम तर्फे कंगनाची  पोस्ट डिलिट करण्यात आली होती. यावर कंगनाने मजेशीर अंदाजात स्टोरी शेअर करत लिहले होते की इथे सुद्धा जास्त दिवस टिकू शकणार नाही. कंगनाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यावर अनेकांनी चिंता व्यक्त करत लवकर बरे होण्याकरिता शुभेच्छा दिल्या होत्या.


हे हि वाचा – नील-नेहाच्या संवेदनशील नात्याचा ‘जून’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

- Advertisement -

 

 

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -