घरताज्या घडामोडीम्युकरमायकोसिसाठी दीड ते २ लाख इंजेक्शनची गरज, पंतप्रधान मोदींकडे विनंती करणार -...

म्युकरमायकोसिसाठी दीड ते २ लाख इंजेक्शनची गरज, पंतप्रधान मोदींकडे विनंती करणार – राजेश टोपे

Subscribe

राज्यात सध्या एकुण ५ लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत. यामध्ये ३ लाख कोव्हिशिल्ड आणि २ लाख कोवॅक्सिनचे आहेत.

राज्यात कोरोना प्रादुर्भावासोबत लढाई सुरु असताना म्युकरमयकोसिस या नव्या आजाराने डोकं वर काढले आहे. राज्यात म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० सक्रिय रुग्ण आहेत. या रुग्णांना सध्याच्या घडीला दीड ते २ लाख एम्फोटोरेसीन इंजेक्शनची गरजर आहे. राज्य सरकारतर्फे १ लाख९० हजार इंजेक्शनची मागणी केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती केली आहे. पंतप्रधान नरेंद्रम मोदींकडे महाराष्ट्राला जास्तीचे एलॉटमेंट करण्याची मागणी करावी. तसेच राज्यात सध्या ५ लाख लसींचे डोस उपलब्ध असून दुसऱ्या डोसच्या नागरिकांना लसीकरण करण्यात येणार आहे.

म्युकरमायकोसिस या बुरशीजन्य आजारामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत राज्यात १ हजार ५०० रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये ७५० पर्यंत रुग्ण बरे झाले आहेत. तर ८०० ते ८५० रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या रुग्णांवर उपचार करण्यामध्ये अडचण इंजेक्शनची आहे. एका रुग्णाला दिवसाला ६ एम्फोटेरेसीन इंजेक्शन लागत आहे. याप्रमाणे एकुण ६० ते १०० इंजेक्शन एका रुग्णाला लागतात परंतु याची आजाराची तीव्रता पाहून डॉक्टर निर्णय घेतात.

- Advertisement -

म्युकरमायकोसिस आजारावर जास्त इंजेक्शनची गरज असल्यामुळे याचे नियंत्रण आता केंद्र सरकारच्या अंतर्गत होत आहे. राज्याला १ लाख ९० हजार इंजेक्शनची ऑर्डर करण्यात आली आहे. परंतु कंपन्या डिलिव्हरी करत नाही आहेत कारण केंद्र सरकारने यावर नियंत्रण आणले आहेत. यामुळे महाराष्ट्रा अधिक इंजेक्शनची गरज असल्यामुळे अधिक एलोकेशन द्यावे अशी विनंती केंद्र सरकारकडे करण्यात आली आहे.

सर्व कार्डधारकांना मोफत उपचाराचा फायदा 

म्युकर मायकोसिसचे इंजेक्शन मोठ्या प्रमाणात लागत अलसल्यामुळे महात्मा फुले योजनेत कोणत्याही प्रकारचे कार्ड अंतर्भूत केले आहे. या रुगणांना आधार देण्याचे काम केले जात आहे. यामध्ये सर्व डॉक्टर असतील सर्वसाधारण रुग्णालयात हे उपचार योग्य नाहीत. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत जवळपास हजार रुग्णालय आहेत परंतु ज्या रुग्णालयात उपचार होईल त्या रुग्णालयांचे नाव घोषित करण्यात येईल. दीड लाख रुपयांचा विमा कव्हर करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारने जाणीवपुर्वक जो काही खर्च लागेल त्या सर्व खर्चाची उपाययोजना राज्य सरकारने केली आहे. या ट्र्स्टमध्ये शासनाने पैसे टाकले आहेत. साधारणपणे ज्या रुग्णालयात हे उपचार सुरु आहेत. त्या ररुग्णागलायातील मेडीसीन मोफत देण्याचे काम करत आहोत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून आता पैसे नाही यामुळे उपचर करु शकत नाह असे काही नाही ज्यांना या रोगाची लागण झाली त्यांनी उपचार घ्यावा. यामध्ये सर्व केशरी, सफेद, आणि पिवळ्या रेशनकार्डधारकांना लाभ घेता येणार आहे.

- Advertisement -

म्युकरमायकोसिस इंजेक्शनसाठी ग्लोबल टेंडर

राज्याला अधिक एम्फोटेरेसीन इंजेक्शनची गरज असल्यामुळे जागतिक पातळीवर ग्लोबल टेंडर काढण्यात आले आहे. परंतु या टेंडरमध्ये काही अडचणी आहेत केंद्र सरकारच्या परवानग्या अजूनही बाकी आहेत यामुळे कंपन्या प्रतिसाद देत नाही आहेत. राज्यात कॅरोन कंपनीला ५० हजार इंजेक्शनची ऑर्डर देण्यात आली आहे. एआयजी लाईफ सायन्सला ६० हजार इंजेक्शन सप्लाय करण्याची मागणी केली आहे. परंतु या कंपन्या ३१ मे नंतर इंजेक्शनचा पुरवठा करणार आहेत. परंतु १० दिवस खुप महत्त्वाचे असून यामुळे केंद्र सरकारशी आणि केंद्रीय मंत्री मनसुख माडंवीया यांना विनंती करण्यात आली आहे. भारत, सीरम,मायलम, आणि बीडीआर या कंपन्या देखील इंजेक्शन बनवत आहेत.

राज्यात इंजेक्शन तयार करण्यासाठी प्रयत्न

इंजेक्शनची वाढती गरज लक्षात घेताल राज्यातील कंपन्यांना कच्चा माल उपलब्ध करुन देण्याबाबत प्रयत्न सुरु आहेत. साराभाई कंपनीतून कच्चा माल घेऊन वर्ध्यातील कंपनीत आणि पालघरमधील कंपनीमध्ये म्युकरमायकोसिस इंजेक्शन बनवण्याची तयारी सुरु असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. म्युकर मायकोसिसबाबज जनजागृती करण्यासाठी ९ पानांच्या मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत.

राज्यात सध्या ५ लाख लसींचे डोस उपलब्ध

राज्यात सध्या एकुण ५ लाख लसींचे डोस उपलब्ध आहेत. यामध्ये ३ लाख कोव्हिशिल्ड आणि २ लाख कोवॅक्सिनचे आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात २ कोटी २ लाख ३१ हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात आले आहे. सध्या असलेल्या ५ लाख डोसमध्ये दुसऱ्या डोससाठी असलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. यानंतर लसीचे डोस उरल्यास ४५ वर्षावरील नगारिकांना पहिला डोस देण्यात येणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

लसींची खरेदी करण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. देशातील कंपनी लस पुरवठा करु शकत नसल्यामुळे ग्लोबल टेंडर काढण्यात आले आहे. यामध्ये ५ कोटी लसींची खरेदी करण्यात येणार आहे. येत्या २५ मे पर्यंत ग्लोबल टेंडर ओपन ठेवण्यात आले आहे. परंतु आतापर्यंत कोणत्याही कंपनीकडून प्रतिसाद आलेला नाही. केंद्र सरकारकडून काही परवानग्या बाकी असल्यामुळे कंपन्या प्रतिसाद देत नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -