घरCORONA UPDATECorona Vaccination : मुंबई महापालिकेचे लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर; केवळ चार पुरवठादारांचा...

Corona Vaccination : मुंबई महापालिकेचे लस पुरवठ्यासाठी ग्लोबल टेंडर; केवळ चार पुरवठादारांचा प्रतिसाद

Subscribe

प्रतिसाद देणाऱ्या पुरवठादारांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने त्यांना २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

मुंबईकरांना आवश्यक कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा करण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढले. मात्र, या टेंडरला केवळ चार पुरवठादारांनीच प्रतिसाद दिला आहे. त्यातही त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसल्याने ते सादर करण्यासाठी त्यांना २५ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भतील माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली. मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. पालिकेने विविध उपाययोजना करून जानेवारी २०२१ पर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवले होते. मात्र, काही बेफिकीर नागरिक आणि पालिका प्रशासनाचे काहीसे दुर्लक्ष या कारणांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा वाढला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारला पुन्हा एकदा लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी लागली. आता लावण्यात आलेला लॉकडाऊन १ जूनपर्यंत असणार आहे. परंतु, सुदैवाने सरकार व पालिका यांनी युद्धपातळीवरील केलेल्या विविध उपाययोजनांमुळे आता कोरोनावर काहीसे नियंत्रण आले असून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

- Advertisement -

सध्या मुंबईत लसीकरण सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून मुंबईला केंद्र व राज्य सरकारकडून लसींचा पुरवठा कमी प्रमाणात होत आहे. लसीअभावी पालिकेने मध्यंतरी लसीकरण केंद्र बंद ठेवली होती. लसीचा वारंवार होणारा तुटवडा पाहता मुंबई महापालिकेने मुंबईकरांसाठी एक कोटी लसीचा नियमित व अखंडित पुरवठा होण्यासाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. मात्र, त्याला केवळ चार पुरवठादारांनीच प्रतिसाद दिला.

त्यातच त्यांच्याकडे आवश्यक कागदपत्रे नसल्याची गंभीर बाब समोर आल्याने त्याच्या पूर्ततेसाठी या पुरवठादारांना १८ मेपर्यंतची मुदत संपलेली असतानाही २५ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे. या चारही इच्छुक पुरवठादारांना टेंडर प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावीच लागेल, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -