घरताज्या घडामोडीकुत्रा इमानी असतो, चोर भामट्यांवर भुंकतो, भातखळकरांचे किशोरी पेडणेकरांना प्रत्युत्तर

कुत्रा इमानी असतो, चोर भामट्यांवर भुंकतो, भातखळकरांचे किशोरी पेडणेकरांना प्रत्युत्तर

Subscribe

टक्केवारी हाच धंदा माहित असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार मुंबईकरांसाठी जीवघेणा ठरतोय

पहिल्या पावसामध्येच मुंबईची तुंबई झाली तसेच रात्री मालाडमधील मालवणीत दुमजली घर कोसळल्यामुळे ११ जणांचा मृत्यू झाला आहे. यावरुन भाजपने शिवसेनेवर चांगलाच निशाणा साधला आहे. मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालवणीतील दुर्घटनेचा आढावा घेतला यावेळी त्यांना भाजपच्या आरोपांविषयी विचारण्यात आले होते. यावर पेडणेकरांनी उत्तरात ‘भाजपला भौ-भौ करत राहू दे ते अगदी दूध के धुले आहेत’ असे म्हटलंय. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी पेडणेकरांना प्रत्युत्तर दिले आहे. कुत्रा इमानी असतो तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो अशी खरमरीत टीका अतुल भातखळकर यांनी केली आहे.

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी मालाडमधील दुर्घटनेची माहिती घेतल्यानंतर पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला आहे. यावेळी भाजपच्या आरोपांना प्रतिक्रिया पेडणेकर यांनी म्हटलं आहे की, भाजप काय म्हणतंय ना ते भौ भौ काय करायचं ते त्यांना करत राहू दे. शिवसेना हे करत आहे ते करत आहे असं ते सांगतायत ते अगदी दूध के धुले आहेत नो प्रॉब्लेम असा घणाघात किशोरी पेडणेकर यांनी खेला आहे.

- Advertisement -

कुत्रा इमानी असतो

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. किशोरी पेडणेकर यांचे हे वक्तव्य त्यांचे संस्कार आणि पक्षाची संस्कृती दाखवणारे आहे. महत्त्वाचे म्हणजे कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवर भुंकतो हे लक्षत असू दे अशा शब्दात भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे.

- Advertisement -

टक्केवारी मुंबईकरांसाठी जीवघेणी

केवळ टक्केवारी हाच धंदा माहित असलेल्या मुंबई महानगरपालिकेचा कारभार मुंबईकरांसाठी जीवघेणा ठरतोय. पावसाच्या तुंबलेल्या पाण्यात तकलादू झडप असलेल्या मेनहोलमध्ये पडून केवळ नशिबाने वाचलेल्या दोन महिलांचा व्हिडिओने तुमचा संताप अनावर होईल. मुंबईकरांच्या जीवाशी खेळ चालू आहे. अशी टिका अतुल भातखळकर यांनी केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -