Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Vaccination: मुंबईत ५० हजारांहून अधिक लोक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेच नाही,BMCचा...

Vaccination: मुंबईत ५० हजारांहून अधिक लोक लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी आलेच नाही,BMCचा खुलासा

५० हजारांहून अधिक लोकांना शोधण्यासाठी महापालिकेने एक अभियान राबवले आहे.

Related Story

- Advertisement -

मुंबईला लसींचा मुबलक पुरवठा प्राप्त झाल्यापासून मुंबईत मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली. मुंबईत आतापर्यंत ८ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. तर जवळपास ३१ टक्के लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. मात्र अद्याप लसीचा पहिला डोस घेतलेले ५० हजारांहून अधिक लोक लसीचा दुसरा घेण्यासाठी लसीकरण केंद्रावर आलेच नसल्याचा धक्कादायक खुलासा मुंबई महापालिकेने केला आहे. (Vaccination: More than 50,000 people did not come to get the second dose of vaccine in Mumbai, BMC revealed) आता या ५० हजारांहून अधिक लोकांना शोधण्यासाठी महापालिकेने एक अभियान राबवले आहे. याची जबाबादरी प्रत्येक वॉर्ड ऑफिसरवर देण्यात आली आहे. लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी न आलेल्या लोकांना फोन करुन लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी का येऊ शकले नाही याची माहिती घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, मुंबईची लोकसंख्या ९३.५ लाख इतकी आहे. त्यातील ८ टक्के नागरिकांना लसींचे दोन्ही डोस देण्यात आलेत तर ३१ टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. ५० हजारांहून अधिक नागरिकांनी अद्याप लसीचा दुसरा डोस का घेतला नाही हे समजणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मुंबई शहर इम्यूनाइजेशन विभागाच्या प्रमुख डॉ.शीला जगताप यांनी म्हटले आहे. पुढे त्यांनी असे म्हटले आहे की, लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी न येण्यामागची साधारण: सात कारणांची यादी आम्ही तयार केली आहे. ज्यात गर्भवती होणे, कोरोना पॉझिटिव्ह असणे, एक दोन दिवसात लस घेण्यासाठी येणारे,लस घेतली आहे मात्र कोविनवर दिसत नाही,असे त्यांनी म्हटले आहे. मात्र आतापर्यंत लसीचा दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या सर्वाधिक आहे.

- Advertisement -

देशात महाराष्ट्र राज्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसला. सर्वाधिक रुग्णांची नोंद झालेले मुंबई हे त्यातील एक शहर होते.मात्र महापालिकेच्या यशस्वी कामगिरीनंतर मुंबई आता कोरोनामुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.


हेही वाचा – कोरोना काळात अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ; पालिका शोध घेऊन कारवाई करणार – महापौर

- Advertisement -

 

- Advertisement -