घरताज्या घडामोडीलसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनाच पंढरपुरमध्ये प्रवेश, प्रमाणपत्र तपासून सोडणार - साधना...

लसीचे दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांनाच पंढरपुरमध्ये प्रवेश, प्रमाणपत्र तपासून सोडणार – साधना भोसले

Subscribe

पायी वारी केल्यास गाव बंद ठेवून निषेध करु असा इशारा

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कमी झालेला नाही. कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारने मानाच्या १० पालख्यांना वारीची परवानगी दिली आहे. वारीसाठी नियमावली जारी करण्यात आली आहे. परंतु पायी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी नाकारण्यात आली आहे. वारकरी मंडळींकडून पायी वारीचा आग्रह धरण्यात आला आहे. तसेच पंढरपूरच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांनी ज्या वारकऱ्यांनी दोन लसीचे डोस घेतले असतील अशा वारकऱ्यांनाच पंढरपुरमध्ये प्रवेश देण्याबाबत मागणी केली आहे. तर या वारकऱ्यांच्या लसीकरणाचे प्रमाणपत्र तपासूनच पंढरपुरात प्रवेश दिला जाईल असेही साधना भोसले यांनी म्हटले आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी अजून संपलेला नाही. मागीलवर्षी कोरोना संकट असल्यामुळे आषाढी वारी रद्द करण्यात आली होती. परंतु यावर्षिही कोरोना प्रादुर्भाव आहे. यामुळे पालखी मार्गावर असलेल्या अनेक गावांनी पायी वारीला विरोध केला आहे. यामुळे पंढरपुराच्या दिशेने सर्वात शेवटी असलेल्या वाखरी गावापासून पायी वारीची परवानगी राज्य सरकारने दिली आहे. परंतु या गावाने यावर नकार देऊन पायी वारी केल्यास गाव बंद ठेवून निषेध करु असा इशारा दिला आहे.

- Advertisement -

पंढरपुरात ४८० कोरोनाबाधितांचा मृत्यू

पंढरपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ५५५ कोरोनाबाधितांवर पंढरपुरमध्ये उपचार सुरु आहेत. तर एकुण २४ हजार ७३१ कोरोनाबाधितांची आतापर्यंत नोंद झाली आहे. तसेच ४८० कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांचे दोन डोसचे लसीकरण पुर्ण झालेलं असाव. अशाच वारकऱ्यांना पंढरपुरमध्ये प्रवेश दिला जावा अशी मागणी पंढरपुरच्या नगराध्यक्ष साधना भोसले यांनी केली आहे. राज्य सरकारने मागील वर्षी ३ दिवस पालख्यांना मुक्काम दिला होता परंतु यावर्षी ६ दिवस मुक्कामाची परवानगी दिली आहे. तसेच वारकऱ्यांची संख्याही वाढवली असल्यामुळे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येण्याची भीती आहे. पंढपुरमध्ये संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने दोन डोस घेतलेल्या वारकऱ्यांना परवानगी द्यावी अशी मागणी नगराध्यक्ष साधना भोसले यांनी केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -