घरताज्या घडामोडीआगामी निवडणुकीत आम्हाला एकटं लढू द्या, काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटलं जातंय -...

आगामी निवडणुकीत आम्हाला एकटं लढू द्या, काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटलं जातंय – भाई जगताप

Subscribe

२०२४ मध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचा झाला पाहिजे

काँग्रेसला विधानसभा आणि लोकसभा निवडणूकीत स्वबळावर लढू द्या अशी मागणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांनी केली आहे. भाजपला रामराम करत घरवापसी करणाऱ्या सुनील देशमुख यांच्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमादरम्यान भाई जगताप यांनी काँग्रेसला स्वबळावर लढू द्या अशी मागणी केली आहे. तसेच कोणामध्ये किती हिंमत आहे असंही भाई जगताप यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी २०२४ मध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याचं सांगितले आहे परंतु काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील यांनी पक्षश्रेष्ठी निवडणूकीबाबत निर्णय घेतील असं म्हटलं आहे.

सुनील देशमुख यांनी भाजपला सोडचिट्ठि दिली असून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशाच्या कार्यक्रमात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच.के.पाटील उपस्थित होते. भाई जगताप यांनी संवाद साधताना काँग्रेसला स्वबळावर लढू द्या अशी मागणी केली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. काँग्रेसला तिसरा पक्ष म्हटलं जात आहे. कोरोना काळात काँग्रेसनं केलेलं काम तुम्ही पाहिले आहे. त्यामुळे येत्या निवडणुकींमध्ये काँग्रेसला लढू द्या मग बघुया कोणामध्ये किती ताकद आहे. असे मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

२०२४ मध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचा झाला पाहिजे

सुनील देशमुख यांच्या पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी चव्हाण यांनी म्हटलं आहे की, काँग्रेसचा हात सोडून गेलेल्या अनेक नेत्यांना आता पश्चाताप होत आहे. पुन्हा ते नेते घरवापसी करत आहेत. २०२४ मध्ये काँग्रेस पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरेल तसेच राज्यात २०२४ मध्ये मुख्यमंत्री काँग्रेसचा झाला पाहिजे यासाठी कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

मला तिकिट नाकारले

भाजपमध्ये नाराज असलेल्या सुनील देशमुख यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर भाजपच्या नेत्यांवर आरोप केले आहेत. भाजपमध्ये प्रवेश केला परंतु मन रमलं नाही. माझं तिकीट नाकारण्यात आलं. कोणाचे नाव घेत नाही परंतु पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचं पक्षात वर्चस्व असल्याने मला तिकीट मिळाले अशी टीका सुनील देशमुख यांनी भाजपवर केली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -