घरताज्या घडामोडीCoronavirus Variant: मुंबईत 'डेल्टा प्लस व्हेरिएंट'चा एकही रुग्ण नाही

Coronavirus Variant: मुंबईत ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’चा एकही रुग्ण नाही

Subscribe

मुंबईत कोरोना ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ चा एकही रुग्ण सध्या तरी आढळून आलेला नाही. मात्र एमएमआर क्षेत्रात कोरोना डेल्टा या नव्या स्ट्रेनचा प्रसार होत असल्याचे म्हटले जात असले तरी ते सिध्द झालेले नाही. मात्र खबरदारी म्हणून मुंबईमधून दररोज ५० नमुने पुणे येथील प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले जात आहेत ; मात्र सदर अहवालात डेल्टा प्लस या नवीन स्ट्रेनचा रुग्ण सापडेला नाही. यासंदर्भातील माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. तसेच, नागरिकांनी काळजी करू नये व घाबरून जाऊ नये. कोरोनाची लक्षणे दिसल्यास तात्काळ नजीकच्या रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे.

मुंबई महापालिका आरोग्य यंत्रणेने कोरोनाच्या पहिल्या लाटेचा यशस्वीपणे मुकाबला केला व विविध उपाययोजना युद्धपातळीवर करून त्यावर जानेवारी २०२१ ला नियंत्रणही मिळवले. मात्र त्यानंतर फेब्रुवारीच्या मध्यापासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत अचानक काहीशी वाढ होऊन दुसरी लाट धडकली. परिणामी सरकार व पालिकेने पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करून काही निर्बंध जारी केले. आता गेल्या तीन महिन्यांत पुन्हा एकदा विविध उपाययोजना लागू करून त्यावर जून महिन्याच्या अखेरीस चांगले नियंत्रण मिळविण्यात पालिकेला यश आले आहे. त्यामुळे मुंबई तिसऱ्या स्तरावरून पहिल्या स्तरावर आली आहे.

- Advertisement -

मात्र कोरोना संबंधित तज्ज्ञांकडून तिसऱ्या लाटेची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर पालिका आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सज्ज झाली आहे. नागरिकांनी कोरोनाबाबत सतर्क राहावे. कोणतीही लक्षणे आढळून आल्यास तात्काळ डॉक्टरांकडे जाऊन वैद्यकीय तपासणी करावी आणि आवश्यक ते उपचार घ्यावेत, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त काकाणी यांनी केले आहे.


मुंबई एअरपोर्टवर फ्लाईट ऑन टाइम ,दिल्ली आणि बंगळूरला टाकले मागे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -