घरताज्या घडामोडीओबीसी राजकीय आरक्षणासाठी २६ जूनला चक्काजाम, पोटनिवणुका रद्द करण्याची पंकजा मुंडेंची मागणी

ओबीसी राजकीय आरक्षणासाठी २६ जूनला चक्काजाम, पोटनिवणुका रद्द करण्याची पंकजा मुंडेंची मागणी

Subscribe

मंत्र्यांनी नुसतं घोषणा करायच्या नसतात निर्णय करायचे असतात आणि हे निर्णय करण्यात अपयशी ठरले आहेत.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप महाराष्ट्रात चक्काजाम आंदोलन करणार आहे. ओबीसी राजकीय आरक्षणावरुन महाराष्ट्रात मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. प्रचंड रोष ओबीसींच्या मनात आहे. यामध्येच पाच जिल्ह्यांत निवडणूक लागल्यामुळे ओबीसी समाजामध्ये संताप निर्माण झाला आहे. २६ जूनला होणाऱ्या चक्काजाम आंदोलनात मोठ्या प्रमाणात ओबीसींचा रोष दाखवण्यात येणार आहे. राज्यात १००० ठीकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार असून भाजपचे आमदार, खासदार, पदाधिकारी, कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी असणार आहेत अशी माहिती भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.

आताच्या निवडणूका लागल्या त्या रद्द करण्यात आल्या पाहिजेत अशी मागणी आहे. सरकारने निवडणूक आयोगाशी संपर्क साधून निवडणूक रद्द करण्याची मागणी केली पाहिजे. भाजपकडून निवडणुक आयोगाला पत्र पाठवण्यात येणार आहे. तसेच न्यायालयात धाव घेणार असल्याचेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. या निवडणुका ओबीसीच्या भविष्याला अंधकारात ढकलण्याच्या ठरतील यामुळे ओबीसी राजकीय आरक्षणाचे संरक्षण झाल्याशिवाय इम्पेरिकल डेटाच्या आधारावर सरकारने डेटा दिल्याशावर आणि ओबीसीला आरक्षण दिल्याशिवाय निवडणुक होऊ नये या मागणीवर भाजप ठाम असल्याचे मत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केलं आहे.

- Advertisement -

सरकारच्या मंत्र्यांनी देखील म्हटलं होतं की जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा विषय लागत नाही. तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही. परंतु मंत्र्यांनी नुसतं घोषणा करायच्या नसतात निर्णय करायचे असतात आणि हे निर्णय करण्यात अपयशी ठरले आहेत. निवडणुका लागल्यावर या मंत्र्यांच्या तोंडाला का टाळं बसलं आहे. मंत्र्यांनी स्वतः निवडणुक आयोगाकडे आग्रह धरुन निवडणुका पुढे ढकल्या पाहिजेत असेही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांची सीबीआय चौकशी

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर वसुली करण्याचे आदेश दिल्याचा आरोप केला आहे. सचिन वाझे वसुली करत असल्याचा आऱोप करण्यात आला असून यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पर्यावरण मंत्री अनिल परब यांचेही नाव घेण्यात आले आहे. बदल्यांमधील भ्रष्टाचार वारंवार समोर येत असल्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सीबीआय चौकशी करावी अशी मागणी भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आली आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -