घरताज्या घडामोडीCorona Vaccine: कोरोना लसीचे दोन डोस डेल्टा व्हेरियंटपासून बचाव करू शकतात -...

Corona Vaccine: कोरोना लसीचे दोन डोस डेल्टा व्हेरियंटपासून बचाव करू शकतात – EMAचा दावा

Subscribe

जगभरात अजूनही कोरोना व्हायरस कहर सुरुच आहे. कोरोना व्हायरस अनेक वेळा रुप बदलून काही देशांमध्ये धुमाकूळ घालत आहे. सध्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंट आणि डेल्टा प्लसने जगाची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत १०० देशांमध्ये डेल्टा व्हेरियंट आढळल्याचे समोर आले आहे. पण आता डेल्टा व्हेरियंटपासून बचाव करण्यासाठी कोरोना लसीचे दोन डोस सक्षम असल्याचा दावा युरोपियन मेडिसिन्स एजेंन्सीने केला आहे. याबाबतची माहिती AFP न्यूज एजेंन्सीने दिली असून एएनआय वृत्तसंस्थेने ट्विट केले आहे.

- Advertisement -

 

भारतात ऑक्टोबर २०२०मध्ये आढळलेल्या डेल्टा व्हेरियंट आता जगाची डोकेदुखी झाली आहे. भारतसहित अमेरिका, ब्रिटन, रशिया, दक्षिण आफ्रिका आणि इतर देशांमध्ये डेल्टा व्हेरियंटची संख्या वाढू लागली आहे. ‘ग्लोबल इनिशिएटिव्ह ऑन शेअरिंग ऑल इन्फ्लुएंजा डेटा’च्या (GISAID) माहितीनुसार, मागील चार आठवड्यातील डेटानुसार, ब्रिटन आणि सिंगापूरमधील ज्या नमुन्यांची जिनोम सिक्वेसिंग करण्यात आली, त्यामधील ९० टक्के केसेस डेल्टा व्हेरियंटच्या असल्याचे समोर आले आहे. पण आता युरोपियन मेडिसिन्स एजेंसीने गुरुवारी म्हटले की, ‘कोरोनाचे लसीचे दोन डोस वेगाने पसरणाऱ्या डेल्टा व्हेरियंटपासून बचाव करत असल्याचे दिसत आहे.’

- Advertisement -

युरोपियन मेडिसिन्स एजेंसीने युरोपात फायझर/बायएनटेक, मॉडर्ना, एस्ट्राजेनेका आणि जॉन्सन अँड जॉन्सन या चार लसींना मान्यता दिली आहे. म्हणजेच त्यानुसार ईएमयूने लसीचे दोन डोस डेल्टापासून बचाव करत असल्याचा दावा केला आहे.


हेही वाचा – Covid-19 Vaccine: खुशखबर! भारतीयांचा युरोपात जाण्याचा मार्ग मोकळा; EUचे सात देश आणि स्वित्झर्लंडमध्ये Covishieldला मान्यता


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -