घरमनोरंजनमुलांचे भावविश्व मांडणारा ‘वेलडन बॉईज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

मुलांचे भावविश्व मांडणारा ‘वेलडन बॉईज’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Subscribe

हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार

लहान मुलांच्या जीवनावर आधारित असलेला ‘वेलडन बॉईज’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. साईनाथ चित्र यांची निर्मिती असलेला ‘वेलडन बॉईज’ हा चित्रपट असून लहान मुलांच्या भावविश्वावर या चित्रपटाची कथा गुंफण्यात आली आहे. ‘वेलडन बॉईज’ या चित्रपटाचे लेखन अशोक बाफना व किशोर ठाकूर यांचे असून अशोक मानकर व महेंद्र पाटील यांनी संवाद लिहिले आहेत. या सिनेमाचं चित्रीकरण व तांत्रिक गोष्टी पूर्ण झाल्याची माहिती दिग्दर्शक प्रकाश आत्माराम जाधव यांनी दिली आहे.

अशी असणार कथा

प्रत्येक शाळेत जसे हुशार विद्यार्थी असतात तसेच खोडकर,उनाड व मस्तीखोर विद्यार्थीही असतात. परंतु या मुलांमध्येही कुठेतरी चांगले गुण दडलेले असतात. या मस्तीखोर मुलांचे अंधकारमय भविष्य शिक्षकांमार्फत कसे प्रकाशमय करता येईल, असा एक प्रयत्न या चित्रपटातून केलेला आहे.

- Advertisement -

लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार

चित्रपटातील आशिष निनगुरकर व अशोक मानकर लिखित गाण्यांना श्रीरंग आरस व एस.पी.सेन यांनी संगीत दिले असून पल्लवी केळकर, श्यामल सावके, गीता व जे.पी दत्ता यांनी ही गाणी गायली आहेत. या चित्रपटात मोहन जोशी, विजय पाटकर, शिल्पा प्रभूलकर, प्रिय रंजन, विनोद जॉली, महेंद्र पाटील व आशिष निनगुरकर यांच्याबरोबर अनेक बालकलाकार देखील अभिनय करताना दिसणार आहेत. हा चित्रपट लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे.

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -