घरमहाराष्ट्रफळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था

फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था

Subscribe

फलोत्पादनवाढीसाठी शरद पवार यांच्या सूचनांवर सकारात्मक निर्णय घेऊ

राज्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या धर्तीवर फळपिकांच्या संशोधनासाठी स्वतंत्र संस्था उभारण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी येथे दिली.

महाराष्ट्रातील फलोत्पादनवाढीसाठी शेतकर्‍यांना जागतिक बाजारपेठेतील उत्कृष्ट वाण उपलब्ध करणे, राज्यातील फलोत्पादनवाढीची प्रक्रिया गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, प्रत्येक जिल्ह्यात स्वतःचे वैशिष्ट्यपूर्ण फळपिक विकसित करून त्याचे ब्रॅन्डिंग करणे. आदी, ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी केलेल्या सूचनांवर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेऊन अंमलबजावणी करेल, असेही पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत गुुरुवारी सह्याद्री अतिथीगृहात ‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर बैठक झाली. या बैठकीत बोलताना अजित पवार यांनी राज्यात फलोत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

तर महाराष्ट्रात फलोत्पादनवाढीला आणि फळनिर्यातीला प्रचंड संधी आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र फळपिक जिल्ह्याचे वैशिष्ट्य म्हणून विकसित करता येईल. फलोत्पादन आणि उत्पन्न वाढीसाठी जागतिक स्तरावरील उत्कृष्ट वाण शेतकर्‍यांना उपलब्ध झाले पाहिजेत. यासाठी राज्य सरकारने शेतकर्‍यांना मदत करावी. फळांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ब्रॅन्डिंग निर्माण करण्यासाठी, फळप्रक्रिया उद्योग उभारण्यास शासनाने मदत करावी. फळनिर्यातदारांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणा कार्यक्षम करावी, आदी सूचना शरद पवार यांनी बैठकीत केल्या.

- Advertisement -

राज्यातील फळे आणि भाजीपाला निर्यातक्षम होण्यासाठी राज्य शासनातर्फे प्रयत्न सुरू असून अ‍ॅपेडामार्फत शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले जात आहे. राज्यातील फलोत्पादन क्षेत्र वाढवताना फळांना जिल्हानिहाय भौगोलिक मानांकन देण्यासाठी त्याचबरोबर व्हाकॅडोसारख्या नवीन फळांच्या लागवडीसाठी प्रोत्साहन दिले जात आहे, अशी माहिती कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -