घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रतिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारे मालेगावचे चार भाविक ठार

तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारे मालेगावचे चार भाविक ठार

Subscribe

टेम्पो ट्रॅव्हल्सने निघालेल्या तरुणांवर काळाचा घाला, बीड-उस्मानाबाद रोडवर शुक्रवारी घडली दुर्घटना

तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी टेम्पो ट्रॅव्हल्सने निघालेल्या चार तरुणांचा बीड-उस्मानाबाद रोडवर शुक्रवारी (दि.२३) पहाटे भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला असून, तीनजण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारार्थ सोलापूरला हलवण्यात आले आहे. शरद देवरे (वडगाव), जगदीश दरेकर व सतीश सूर्यवंशी (दोघे रा. दरेगाव), विकास बछाव (रा. सायने) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत.

बीड-उस्मानाबाद रस्त्यावर टेम्पो पंक्चर झाल्याने चालकाने टेम्पो रस्त्याच्या कडेला उभा केला होता. यावेळी भरधाव ट्रकने टेम्पोला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात चौघे जागीच ठार झाले. अपघातानंतर टेम्पोचालक फरार झाला. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपघाताचे वृत्त मालेगाव येथे येताच परिसरात शोककळा पसरली. (सविस्तर वृत्त पान १० वर)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -