घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये भाजपची दत्तक घोषणा फेल : मनसेचा आरोप

नाशिकमध्ये भाजपची दत्तक घोषणा फेल : मनसेचा आरोप

Subscribe

नाशिक शहर भाजपने दत्तक घेतलं खरं पण गेल्या पाच वर्षात शहराची कुठलीही प्रगती होतांना दिसली नाही. त्यामुळे भाजपची दत्तक नाशिकची घोषणा फेल ठरल्याचंच दिसून येत अशी टिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली. मनसे नेते अमित ठाकरे आणि संदिप देशपांडे हे दोन दिवसांच्या नाशिक दौर्‍यावर आहेत. नाशिकमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

भाजप, मनसे युतीबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असतांना मनसेने भाजपच्या नाशिकच्या कामगिरीवरच शरसंधान साधले आहे. यावेळी बोलतांना पक्षाचे सरचिटणीस संदिप देशपांडे यांनी भाजपच्या कामगिरीवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, पाच वर्षात नाशिककरांची घोर निराशा झाली आहे. पाच वर्षात भाजपच्या सत्ताकाळात नाशिकमध्ये कुठलीही प्रगती होतांना दिसली नाही. तुलनेने जर मनसेच्या सत्ताकाळातील कामे आपण जर बघितली तर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जे प्रकल्प नाशिकमध्ये राबवले ते यापूर्वीही कोणी नाशिकमध्ये राबवले नाही अन आमच्यानंतर सत्तेत असलेलेही राबवू शकले नाही. त्यामुळे नाशिककरांचा भ्रमनिराश झाला आहे. नाशिक अन राज ठाकरे एक समीकरण आहे. राज ठाकरे यांना नाशिककरांनी प्रेम दिलंय. तेवढंच प्रेम राज ठाकरेंनी नाशिककरांवर केलं. आगामी महापालिका निवडणुकांना सामोरे जातांना मनसेने सत्ताकाळात जी कामे केली आणि भविष्यात अधिक सुंदर नाशिक घडविण्याचा आमचा प्रयत्न आहे. याकरीता आम्ही तयारी सुरू केली आहे. काही पक्ष असतात काम एक रूपयाची करतात शंभर रूपयांची मार्केेंटींग करतात आम्ही कामं शंभर रूपयांची केली मात्र मार्केटींग करू शकलो नाही ती आमची चुक झाली असावी असे सांगत त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

- Advertisement -

सरकार निष्क्रिय

कोकण, पश्चिम महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीबाबत बोलतांना ते म्हणाले, कोकणात पाच दिवस अगोदर हवामान विभागाने ‘रेड अलर्ट’ होता. त्या अनुषंगाने प्रशासनाने ही परिस्थिती हाताळण्यासाठी एसओपी तयार करणे गरजेचे होते. एनडीआरएफ टीम असेल, बोटींची व्यवस्था अशा व्यवस्था करायला हव्या होत्या पण अशी कोणतीही व्यवस्था केली गेली नाही. पुराचं पाणी १६ फुटांवर गेल्यावर प्रशासन जागं झाले. नागरिकांच्या सुरक्षेचा कोणतेही उपाय करण्यात आले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. पूरग्रस्तांना सरकारकडून देण्यात येणार्‍या मदतीबाबतही त्यांनी शंका उपस्थित केली.

घरी बसणार्‍यांकडे राज्याची सत्ता

पूर परिस्थितीवर उपाययोजना आखतांना नद्यांवर भींत बांधल्याची संकल्पनला काहींनी पुढे आणली. यावरही त्यांनी जोरदार टिका केली. नद्यांवर भींत बांधल्याचे कोणी ऐकलयं का सरकारने नागरिकांची चेष्टा लावली का यातून पैसे खायचा विचार आहे का यामुळे काय पुरपरिस्थिती टाळता येईल का असे सवाल उपस्थित करत सरकार निष्क्रिय असल्याचा आरोप त्यांनी केला. घरी बसणार्‍यांकडे या राज्याची सुत्र असल्याचे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. समुद्रात जाऊन शिवस्मारकाचे दोन वेळा भुमिपुजन केलं, कुठे आहे ते शिवस्मारक, ज्या नेत्यांकडे व्हिजन आहे अशांकडे सत्ता द्यावी असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -