घरCORONA UPDATEMaharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण घटले; ६,८५७ नव्या...

Maharashtra Corona Update: राज्यात २४ तासांत कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण घटले; ६,८५७ नव्या रुग्णांची नोंद

Subscribe

राज्यात हळूहळू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. त्यामुळे सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी असणाऱ्या जिल्ह्यांमधून लॉकडाऊनसह निर्बंध पूर्णतः हटवले जाण्याची शक्यता आहे. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णदर १ टक्क्यापेक्षा कमी आहे, असे जिल्हे लॉकडाऊनमुक्त होण्याची शक्यता आहे. राज्यात असे १४ जिल्हे असून आरोग्य विभागाने याची यादी मुख्यमंत्र्यांकडे सादर केली आहे. पण यादरम्यान राज्यातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या वाढताना दिसत असून कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण आज घटले आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ८५७ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २८६ मृत्यूची नोंद झाली आहे. तर ६ हजार १०५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात मंगळवारी बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या १२ हजार ६४५ होती, मात्र आज निम्मी झाली आहे.

आता राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ६२ लाख ८२ हजार ९१४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ३२ हजार १४५ जणांचा मृत्यू झाला असून ६० लाख ६४ हजार ८५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.५३ % एवढे झाले आहे. तर राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे. सध्या राज्यात एकूण ८२ हजार ५४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४ कोटी ७३ लाख ६९ हजार ७५७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६२ लाख ८२ हजार ९१४ (१३.२६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४ लाख ८८ हजार ५३७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ३ हजार ३६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


हेही वाचा – Mumbai Corona Update: मुंबईत २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत किंचित वाढ, ६ जणांच्या मृत्यूची नोंद

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -