घरCORONA UPDATEरेस्टॉरंटच्या indoor dining मधून कोरोना पसरण्याचा धोका का वाढतो? टास्क फोर्सच्या सदस्याने...

रेस्टॉरंटच्या indoor dining मधून कोरोना पसरण्याचा धोका का वाढतो? टास्क फोर्सच्या सदस्याने मांडले मत

Subscribe

मुंबईत कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात येताच अनलॉकच्या निर्बंधांतून टप्प्याटप्पाने शिथिलता देण्यात आली. या निर्बंधांतून रेस्टॉरंट्स, हॉटेल सुरु ठेवण्याच्या नियमातही बदल होती अशी आशा होती. मात्र प्रशासनाने रेस्टॉरंटस्, हॉटेल, भोजनालयावरील निर्बंध तसेच ठेवण्य़ात आले. कारण रेस्टॉरंटच्या indoor dining मधून कोरोना संक्रमणाचा धोका सर्वाधिक वाढतोयं. असे मत टास्क फोर्सच्या सदस्यांनी व्यक्त केलं आहे.

रेस्टॉरंट ही अशी एकमेव जागा आहे जिथे लोकं विनामास्क असतात. त्यामुळेच कदाचित शहरातील रेस्टॉरंट्सवरील निर्बंध कायम ठेवण्यात आलेत. असे मत महाराष्ट्राच्या कोव्हिड-१९ टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केलं.

- Advertisement -

सध्या मुंबईत सायंकाळी ४ वाजेपर्यंत रेस्टॉरंट indoor dining सर्विस सुरु ठेवण्याची परवानगी आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर अनेक रेस्टॉरंट्स, हॉटेल मालकांनी ग्राहकांचा एकमेकांचा मर्यादित संपर्क येईल यासाठी नवीन पर्याय शोधून काढले. यात रेस्टॉरंटम सिटींगमध्ये बदल करणे, डिजिटल मेन्यू कार्ड, ऑनलाईन ऑर्डर सिस्टम असे काही पर्याय वापरले गेले. मात्र कोरोना पसरवणारा एक बदल रेस्टॉरंटच्या indoor dining मध्ये करण्यात आला नाही, तो म्हणजे एअर कंडिशनर. (air conditioners)

यावर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-बॉम्बे (IIT-B) मधील मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाचे सहयोगी प्राध्यापक रजनीश भारद्वाज यांनी सांगितले की, रेस्टॉरंटच्या indoor dining मध्ये एसी असल्याने बाहेरची हवा आता येऊ शकत नाही, त्यामुळे तीच हवा सतत सर्वत्र फिरत राहते. या हवेत धुलिकणांची संख्या सर्वाधिक असते. त्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढतो.

- Advertisement -

भारद्वाज यांच्या मते, रेस्टॉरंटमध्ये पूर्णपणे कुलिंग असल्याने याठिकाणी बसून खाल्ल्याने कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका अधिक वाढतो. मात्र कुलिंग नसलेल्या हवेशीर जागांमध्ये हा धोका किंचित कमी असतो. तर खुल्या हवेशीर ठिकाणी हा धोका आणखी कमी होतो. कारण रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी येणारा कोणीही ग्राहक मास्क घालत नाही. याठिकाणी विषाणू सहज पसरु शकतो.

जर्नल ऑफ कोरियन मेडिकल सायन्स जर्नलमध्ये २०२० रोजी प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, एखाद्या कोरोना संक्रमित व्यक्तीच्या दिशेने रेस्टॉरंटच्या indoor dining सेटिंगमधील हवेचा प्रवाह थेट होत असेल तर त्या हवेतील एक थेंबही २ मीटर (६ फूट) पेक्षा जास्त अंतरापर्यंत पसरू शकतो.

यावर रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्राने असे म्हटले की, खुल्या हवेच्या ठिकाणी कोरोना संसर्गाचा धोका कमी असतो. त्यामुळे शक्य तितक्या बाहेरील हवेचा प्रवाह सतत सुरु ठेवण्याचा सल्ला दिला जातो. उदाहरणार्थ, खिडक्या आणि दारं खुली ठेवतं बाहेर बसण्यास प्राधान्य देऊ शकता.

वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शहरातील जवळपास ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाल्यानंतरचं रेस्टॉरंट्सवरील निर्बंध शिथिल करणे फायद्याचे ठरेल. कारण जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण पूर्ण झाल्याने हॉटेल किंवा रेस्टॉरंट्समध्ये सुरक्षित वातावरण तय़ार होऊ शकते.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -