घरताज्या घडामोडीआरक्षण दिलं नाही तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरु देणार नाही, बावनकुळेंचा इशारा

आरक्षण दिलं नाही तर एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरु देणार नाही, बावनकुळेंचा इशारा

Subscribe

प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत कोणी अफवा पसरवली? आणि यामगचे कारण काय? याचा शोध आम्ही घेणार आहोत.

ओबीसी आरक्षणावरुन भाजपने महाविकास आघाडी सरकरला डिसेंबर महिन्यापर्यंत अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण देऊन समजाला न्याय दिला पाहिजे अशी मागणी भाजप नेते चंद्रशेख बावनकुळे यांनी दिली आहे. तसेच डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला असून जर आरक्षण दिलं नाहीतर एकाही महाविकास आघाडीच्या मंत्र्याला आणि नेत्याला रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराच चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाची बातमी १०० टक्के चुकीची असल्याचेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाविकास आघाडीला इशाराच दिला आहे. राज्य सरकारला केंद्र सरकारकडे बोट दाखवण्याच्या कामाशिवाय काही येत नाही. केंद्र सरकारने राज्याला सर्व अधिकार देण्याची व्यवस्था केली आहे. यामुळे केंद्र सरकारने विधेयक पास केल्यावर राज्य सरकारने तात्काळ ओबीसींना आरक्षण दिलं पाहिजे. फडणवीस सरकारने आरक्षण दिलं आणि ते टिकवून दाखवलं होते. मात्र या सरकारला मराठा आणि ओबीसी आरक्षण टिकवण्यात अपयश आलं असून राज्य सरकारला आरक्षण द्यायचच नाही. महाविकास आघाडी सरकारला ओबीसी आरक्षणासाठी डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम देत आहोत. जर आरक्षण दिलं नाही तर राज्यातल्या एकाही मंत्र्याला आणि आमदाराला रस्त्यावर फिरु देणार नाही असा इशाराच चंद्रशेख बावनकुळे यांनी दिला आहे.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्ष बदलाची बातमी चुकीची

भाजप नेते चंद्रकांत बावनकुळे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष बदलाबाबतच्या चर्चांचे खंडन केलं आहे. चंद्रकांत पाटील हे आमचे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्वामध्ये भाजप महाराष्ट्राच चांगले काम करत आहेत. राज्यातील मंत्र्यांना भेटण्यासाठी भाजपचे सगळे नेते दिल्लीत आलो असून या भेटीमध्ये राज्याला कसा फायदा होईल या दृष्टीने चर्चा करणार असल्याचे चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगिले आहे. तसेच प्रदेशाध्यक्ष बदलण्याबाबत कोणी अफवा पसरवली? आणि यामगचे कारण काय? याचा शोध आम्ही घेणार आहोत. तसेच असं सांगताना अशा चर्चा कोण पसरवत आहे. याबाबत आम्हाला चांगलीच माहिती असल्याचेही बावनकुळेंनी नमूद केलं आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -