घरमहाराष्ट्रनिलेश राणेंची खालच्या पातळीवर टीका

निलेश राणेंची खालच्या पातळीवर टीका

Subscribe

संजय निरुपम यांच्या वक्तव्यानंतर निलेश राणे यांनी आपल्या अधिकृत ट्विटरवरुन खालच्या पातळीवर टीका केली आहे. निरुपमयांचे व्यंगचित्र प्राकाशित झाल्यानंतर ही टीका करण्यात आली.

निवडणुकीच्या पाश्वभूमीवर मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्या विरोधकांनी जबरदस्त टीकेची झोड उठवली. यामध्येच माजी खासदार निलेश राणे यांनीही आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन संजय निरुपम यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे. उत्तर भारतीय लोकांमुळेच महाराष्ट्र चालतो असे संजय निरुपम यांनी वक्तव्य केले होते. यानंतर मनसेकडून निरुपम यांचे एक व्यंग चित्र प्रकाशित करण्यात आले. या व्यंगचित्रात निरुपम यांची तुलना कुत्र्याशी केली होती. मात्र निलेश राणे यांनी एक पाऊल पुढे जाऊन निरुपम यांच्यावर टीका केली आहे. या टीकेत निरुपम यांना ‘भिकारडा’ म्हटलं आहे. निलेश राणेच्या या टीकेचा काँग्रेसकडून विरोध होत आहे. यापूर्वीही निलेश राणे यांनी संजय निरुपम विरोधात अनेकदा खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे. मात्र यावेळी केलेल्या टीकेमध्ये निरुपम यांच्या पत्नीचाही उल्लेख करण्यात आला.

काय आहे टीका

निरूपमला परत कुत्रा चावला किंव्हा निरुपम कुत्र्याला चावला… निरूपमला जेवण देणारी बायको (सौ. गीता वैद्य (निरुपम) मराठी आहेत. हा भिकारडा विसरला वाटतं. मराठी माणसाची चिंता करू नको संज्या.- निलेश राणे

- Advertisement -

 

- Advertisement -

निरुपमयांच्यावर का झाली होती टीका

उत्तर भारतीय लोक मुंबई आणि महाराष्ट्र चालवतात त्यामुळे जर हे निघून गेले तर महाराष्ट्र ठप्प होईल असे वक्तव्य निरुपम यांनी नागपूर येथे केले होते. यानंतर निरुपमयांच्या विरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली. निरुपम परप्रांतीय भटका कुत्रा असून, केवळ परप्रांतीय मतांवर डोळा ठेवत ते अशी विधाने करत आहेत असे व्यंगचित्र मनसेकडून प्रकाशित करण्यात आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -