घरमहाराष्ट्रराष्ट्रवादीवर नाराज उदयनराजेंना पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच

राष्ट्रवादीवर नाराज उदयनराजेंना पक्षात घेण्यासाठी रस्सीखेच

Subscribe

उदयनराजे यांच्या रुपाने आपल्या पक्षाला एक खासदार मिळावा, यासाठी त्यांना आपल्या पक्षात ओढण्यासाठी अनेक पक्ष प्रयत्नशील दिसत आहेत.

सातारा लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे सध्या पक्षावर नाराज आहेत. स्वपक्षातूनच आपल्या उमेदवारीला विरोध होत असल्यामुळे उदयनराजे यांनी सातारामधून लोकसभा लढवणारच, अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली आहे. त्यामुळे आता इतर पक्षांनी उदयनराजेंना आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे भावी उमेदवार नितेश राणे यांनी आपल्या पक्षात उदयनराजे यांनी यावे, अशी ऑफरच त्यांना दिली आहे. रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक राज्यमंत्री रामदास आठवले आज मुंबईत बोलले की, २०१९ च्या निवडणुकीत जर राष्ट्रवादी काँग्रेसने उदयनराजे वगळता इतर कुणाला उमेदवारी दिल्यास रिपाइकडून उदयनराजेंनी निवडणूक लढवावी, अशी ऑफर आठवले यांनी दिली आहे.

हे वाचा – उमेदवारीला विरोध असला तरी मी लोकसभेसाठी इच्छुक – उदयनराजे भोसले

तर दुसऱ्याबाजुला काँग्रेसमध्ये सध्या शरीराने असलेले मात्र मनाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात गेलेले नितेश राणे यांनी देखील उदयनराजेंना पक्षात येण्याची ऑफर दिली आहे. नितेश राणे यांनी ट्विट करुन ही ऑफर दिली आहे. ते म्हणाले की, “उदयनराजे एक ताकदवर नेते आहेत..आमचे चांगले मित्र आहेत. मी लवकरच महाराष्ट्र स्वाभिमान पक्षत जात आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्षात त्यांच ही स्वागत आहे!”

- Advertisement -

लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने बैठकीचे सत्र सुरु केले आहे. उदयनराजे खासदार असल्याने सातारा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. यावेळी आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे यांच्यातील संबंध जास्तच ताणले गेल्याने उदयनराजे यांच्याऐवजी विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी होत आहे. याच विषयावर माध्यमांशी बोलताना उदयनराजे म्हणाले की, “पवार साहेब जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल. माझे मागच्यावेळचे लीड तोडणारा एखादा उमेदवार असेल तर त्याला उमेदवारी द्यावी. पवारांचे जसे इतर पक्षात मित्र आहेत, तसेच माझेही आहेत.”, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले होते.

- Advertisement -

हे बघा – ‘फक्त फसवू नका’, उदयनराजेंनी शरद पवारांना सुनावलं!

उदयनराजे यांची सातारा लोकसभा मतदारसंघावर चांगलीच पकड आहे. त्यामुळे ते जर आपल्या पक्षात आले तर एक खासदार निश्चित निवडून येऊ शकतो, यासाठी आता सर्वच पक्ष उदयनराजे यांना आपल्या पक्षात खेचण्याचा प्रयत्न करत आहेत.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -