घरदेश-विदेशICAI कडून सीए फाउंडेशन आणि अंतिम परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, जाणून घ्या...

ICAI कडून सीए फाउंडेशन आणि अंतिम परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर, जाणून घ्या डिटेल्स

Subscribe

ICAI CA July 2021 Exam: इंस्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउन्टंट्स ऑफ इंडियाने जुलै २०२१ मध्ये आयोजित केलेल्या ( Institute of Chartered Accountants of India, ICAI) र्चार्टर्ड अकाउन्टंट्स (Chartered Accountants, CA) च्या अंतिम परीक्षेसह जुना आणि नवीन अभ्यासक्रम (Old course and New Course) तसेच फाउंडेशन परीक्षेच्या अंतिम निकालाची वेळ आणि तारीख जाहीर केली आहे.

ICAI अधिसूचनेनुसार, हा अंतिम निकाल १३ सप्टेंबर किंवा १४ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे परीक्षेत सहभागी विद्यार्थींना ICAI च्या icai.org या अधिकृत वेबसाइटवर निकाल पाहता येणार आहे.  यासाठी उमेदवारांना आपला रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन किंवा पिन नंबर भरून निकाल मिळवावा लागेल. ICAI आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर यासंदर्भात एक ट्विट देखील केले आहे.

- Advertisement -

त्यानुसार, जुलै २०२१ मध्ये आयोजित चार्टर्ड अकाउन्टंट्स अंतिम परीक्षेचा (जुना अभ्यासक्रम आणि नवीन अभ्यासक्रम) आणि फाउंडेशन परीक्षेचा निकाल सोमवार, १३ सप्टेंबर २०२१ (संध्याकाळ) / मंगळवार, १४ सप्टेंबर २०२१ रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. सीएची अंतिम परीक्षा ५ जुलै ते १९ जुलै दरम्यान घेण्यात आली होती. तर सीए अंतिम ग्रुप 1 ची परीक्षा ५, ७, ७ आणि ११ जुलै रोजी झाली होती. याशिवाय सीए अंतिम ग्रुप 2 ची परीक्षा १३3, १५, १७ आणि १९ जुलै रोजी घेण्यात आली.

- Advertisement -

याच परीक्षेत सहभागी विद्यार्थ्यांना icaiexam.icai.org, caresult.icai.org, icai.nic.in वर त्यांचे निकाल या वेबसाईटवर पाहता येणार आहे.ICAI CA Foundation आणि Final परीक्षेचा निकाल इमेलद्वारे देखील मिळू शकणार आहे. निकाल पाहण्यासाठी उमेदवारांनी आपल्या ईमेल आयडी सह aticaiexam.icai.org वर नोंदणी करायची आहे. अशा उमेदवारांना निकाल ईमेलद्वारे देखील मिळणार आहे.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -