घरमनोरंजननिक जोनसने वाढदिवसानिमित्त प्रियंका चोप्रासह शेअर केला रोमँटिक फोटो

निक जोनसने वाढदिवसानिमित्त प्रियंका चोप्रासह शेअर केला रोमँटिक फोटो

Subscribe

बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा आणि हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक अभिनेता निक जोनस यांची जोडी नेहमीच चर्चेचा विषय असते. सतत इंस्टाग्रामवर नवनवीन पोस्ट करत प्रियांका आणि निक आपल्या खासगी आयुष्यातील अपडेट फॅन्सला देत असतात. सोशल मीडियावर प्रियंका अनेकदा तिच्या फॅशन सेन्समुळे चर्चेत असते. मात्र अनेकदा प्रियंका आणि निकला त्यांच्या कपड्यांवरून तर कधी अजबगजब पोजवरून ट्रोल केलं जातं. मात्र एका नव्या फोटोमुळे प्रियंका आणि निक जोनस पुन्हा चर्चेत आले आहेत. १६ सप्टेंबरला निक जोनसने त्याचा २९ वा वाढदिवस साजरा केला. पतीचा वाढदिवस अधिकच स्पेशल करण्यासाठी प्रियंकाने कोणतीही कसर सोडली नाही. या सेलिब्रेशनचे काही खास फोटो दोघांनी शेअर केलेत. प्रियंकाने निक सोबतचा अतिशय रोमँटिक फोटो शेअर केला आहे. चाहत्यांना त्यांचा रोमँटिक अंदाज अधिकच आवडला आहे.

- Advertisement -

प्रियंकाने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, माझ्या आयुष्यातील संवेदशील आणि प्रेम करणाऱ्या व्यक्तीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आय लव्ह बेबी… तू माझाचं असल्याबद्दल धन्यवाद. या फोटोमध्ये निक प्रियंकाची किस घेताना दिसतोय. प्रियांका आणि निक त्यांच्या रिलेशनशिपबाबत नेहमीच भावुक पोस्ट करत असतात. इन्स्टाग्रामवरील तिच्या फोटोला फॅन्स आणि बॉलिवूड सेलेब्सकडूनही चांगली पसंती मिळत असते. तर अनेकादा फॅन्स त्यांना ट्रोल करतात.

प्रियंका सध्या तिचा नवा सिलेडल या शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. अलीकडेच प्रियांका चोप्राने जगप्रसिद्ध वोग मासिकासाठी देखील फोटोशूट केले होते. इतकेच नाही तर सप्टेंबर महिन्यात प्रियंका वोगची कव्हर गर्ल बनली होती. या फोटोशूटमध्ये प्रियंकाने लाल रंगांचा अतिशय सुंदर असा ड्रेस वेअर केला होता. खास गोष्ट म्हणजे या ड्रेसवर तिने चक्क मंगळसूत्र परिधान केले होते. यामुळे प्रियंकाचा लूक अतिशय सुंदर, लक्ष्यवेधी दिसत होता.

- Advertisement -

तरुण दिसण्यासाठी अनिल कपूर पितोय सापाचे रक्त? अभिनेत्याने केला खुलासा


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -