घरमनोरंजनतरुण दिसण्यासाठी अनिल कपूर पितोय सापाचे रक्त? अभिनेत्याने केला खुलासा

तरुण दिसण्यासाठी अनिल कपूर पितोय सापाचे रक्त? अभिनेत्याने केला खुलासा

Subscribe

बॉलिवूडमधील चार्मिंग अभिनेता अनिल कपूर गेल्या काही दिवसांपासून अधिक चर्चेत आहे. बॉलिवूडमध्ये हिट चित्रपटांनी त्याने गेली अनेक दशकं गाजवली. तरुण कलाकारांना लाजवेल अशी त्याची पर्सनॅलिटी आहे. त्यामुळे अनिल कपूर चित्रपटांबरोबरचं फिटनेससाठी अधिक चर्चेत असतो. सोशल मीडियावरही तो फिटनेसबाबत व्हिडिओ, फोटो शेअर करत असतो. वयाच्या ६४ व्या वर्षीही तो दिवसातून अधिक तास वर्कआउट करतो. त्याची त्वचा इतकी टवटवीत दिसते, की त्यांच्या वयाचा अंदाज बांधणेदेखील अनेकदा कठीण होते.

काही दिवसांपूर्वी अनिल कपूरने अरबाज खानच्या ‘पिंच २’ या शोमध्ये हजेरी लावली होती. या शोदरम्यान अरबाजने अनिल कपूरला असे काही प्रश्न विचारले ज्याची अनिलने अगदी मजेशीर उत्तरे दिली. अरबाज खानने यावेळी अनिल कपूरला काही लोकांचे व्हिडिओ दाखवले. त्या व्हिडिओवर अनेकांनी अनिल कपूरच्या लूकवर भन्नाट भन्नाट कमेंट्स केल्या होत्या. एक व्यक्तीने लिहिले होते की, अनिल कपूरला ब्रम्हाकडून एक वरदान मिळालं आहे. तर दुसऱ्या एकाने लिहिले होते की, मला वाटतं की प्लास्टिक सर्जनला आपल्यासोबत ठेवतात आणि सापाचं रक्त पितात.

 

View this post on Instagram

 

A post shared by anilskapoor (@anilskapoor)

- Advertisement -


अरबाज खानने अनिल कपूर आणि त्यांच्या मुली आणि पत्नीवर टोलर्सनी केलेल्या ट्रोलिंग कमेंट्सही वाचून दाखवल्या. पण या ट्रोलिंग कमेंट्सला अजिबात वाईट रिअॅक्ट न होता हुशारीने उत्तरं दिली. यात एका ट्रोलर्सने कमेंट्समध्ये लिहिले होते की, अनिल कपूर आणि त्याची मुलगी पैशांसाठी काहीही करु शकतात. या ट्रोलिंगला उत्तर देताना अनिल कपूर म्हणाला, त्यांचा दिवस वाईट असेल किंवा काही कारणाने तो दु:खी असेल. तर दुसऱ्या एका ट्रेलर्सने कमेंट्समध्ये म्हटले की, ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांना लाज नाही वाटत तर ज्यांना लाज वाटते त्यांच्याकडे पैसा नसतो.’

या ट्रोलिंगला उत्तर देत अनिल कपूर म्हणाला की, ‘जर तुम्हाला काही माहिती नसेल तर त्यावर मतं व्यक्त करू नका.’ तर तिसऱ्या ट्रोलर्सने विचारलं होतं की, ‘६४ व्या वर्षी यंग दिसण्याचं रहस्य काय,’ त्यावर अनिल कपूर म्हणाले ‘प्रेक्षकहो, आम्हाला आमचे खर्च पाहता येतात, आणि जर आम्ही चांगले नाही दिसलो तर आम्हाला कोण पाहणार.’ अशा अनेक प्रश्नांची मजेशीर आणि विचार पूर्वक उत्तरं अनिल कपूरने दिली.

- Advertisement -

भाजपचे सेवा-समर्पण अभियान, तर काँग्रेसचा बेरोजगार दिवस


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -