घरक्राइमहोर्डिग्जवर पोलीस आयुक्तांचा आदेश क्रमांक नसल्यास गुन्हे

होर्डिग्जवर पोलीस आयुक्तांचा आदेश क्रमांक नसल्यास गुन्हे

Subscribe

नाशिक शहरात रविवारपासून होणार अंमलबजावणी

नाशिक शहरात रविवार (दि.१९) पासून पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिग्जवर पोलीस आयुक्त यांचे आदेश क्रमांक नमूद करणे आवश्यक राहणार आहे. आदेश क्रमांक नसतील ते बेकायदा ठरविले जाणार असून, ते नष्ट केले जाणार आहेत. त्या पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिग्ज, फलकावर व्यक्ती, संघटनेचे नाव असल्यास त्या व्यक्ती किंवा संघटनेच्या अध्यक्ष, संचालक, सचिवांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. पोलीस आयुक्तांचा हा आदेश नाशिक महापालिका निवडणुका पूर्ण होईपर्यंत कायम राहणार आहे. आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांवर कमीत कमी चार महिने व एक वर्षापर्यंत कारागृहाची शिक्षा व सशुल्क दंड केला जाणार आहे.

आगामी दसरा, ईद-ए-मिलाद, दिवाळी, ख्रिसमस, नववर्ष आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोस्टर्स, बॅनर्स, होर्डिग्ज, फलकाच्या माध्यमातून नाशिकमधील समाजामध्ये असंतोष, तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, नाशिक शहर पोलीस सज्ज झाले आहेत. जाहिरातीव्दारे सार्वजनिक नितिमत्ता आणि सभ्यता यांचे उल्लंघन होण्याचा संभव आहे, असे जाहिरात फलक लावण्यास परवानगी देण्यात येणार नाही.

- Advertisement -

फलक नष्ट करण्याची कार्यवाही संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी व नाशिक महापालिकेचे वॉर्ड अधिकारी किंवा महापालिका आयुक्त ज्यांना निर्देश देतील ते अधिकारी करणार आहेत. महापालिकेतर्फे शासकीय व खासगी जाहिरात फलकांना परवानगी दिली जाते. मात्र, या ठिकाणी प्रत्येक जाहिरात फलकांवरील मजकूर पोलीस आयुक्त पाहणी करणार आहेत. त्यासाठी महापालिकेस प्रत्येक होर्डिग्जचा मजकूर पोलीस आयुक्तांकडे प्रमाणित करण्यासाठी पाठवावा लागणार आहे. त्यानंतर पोलीस आयुक्त यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच होर्डिग्ज लावण्यास परवानगी मिळणार आहे.

महापालिकेने परवानगी दिल्यानंतरच संबंधित व्यक्ती किंवा संघटनांनी होर्डिग्ज लावता येणार आहेत. त्यावेळी होर्डिग्जवर परवानगी क्रमांक व मुदत, अर्जदाराचे नाव पोलीस आयुक्तांकडून प्रमाणित करुन घ्यावे. महापालिकेने निश्चित केलेल्याच ठिकाणी होर्डिग्ज, फ्लेक्स, पोस्टर्स, बॅनर्स लावता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -