घरमुंबईरजनी पाटील यांची बिनविरोध निवड

रजनी पाटील यांची बिनविरोध निवड

Subscribe

भाजप उमेदवाराची माघार, राज्यसभा पोटनिवडणूक

राज्यातील राज्यसभेची पोटनिवडणूक अपेक्षेप्रमाणे बिनविरोध पार पडली आहे. भाजपचे उमेदवार संजय उपाध्याय यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसच्या उमेदवार रजनी पाटील या बिनविरोध निवडून आल्या आहेत. निवडणूक आयोगाकडून पाटील यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा लवकरच करण्यात येईल.

राज्यसभा पोटनिवडणूक बिनविरोध म्हणून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीस यांनी पक्षात चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार भाजपने आपला उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज या निर्णयाची माहिती दिली.

- Advertisement -

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या पोटनिवडणुकीसाठी भाजपने संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली होती. राज्यसभेसाठी खुले मतदान असल्याने काँग्रेसचा उमेदवार निवडून येणार हे निश्चित होते. त्यामुळे भाजपने आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी भाजपने उमेदवारी मागे घेतली.

आज माझा लहान भाऊ राजीव सातव यांची आठवण येते, अशा भावना व्यक्त केल्या. भाजपने मनाचा मोठेपणा दाखवला, त्याबद्दल त्यांचे आभार. सगळ्यांनी समजूतदारपणा दाखवला, दिल्लीत मला आशीर्वाद मिळाले. राज्यातून देखील अनेकांनी पुढाकार घेऊन मला ही संधी मिळाली.
–रजनी पाटील, राज्यसभा उमेदवार, काँग्रेस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -