घरलाईफस्टाईलझटपट किचन टीप्स

झटपट किचन टीप्स

Subscribe

स्वयंपाक घरातील झटपट किचन टीप्स

गृहीणींना रोजचा स्वयंपाक करताना काही छोट्या – मोठ्या अडचणी येतात. अशावेळी नेमके काय करावे हा प्रश्न पडतो. अशा गृहीणींनकरता स्वयंपाक घरातील चमत्कारी किचन टीप्स

  • डाळ शिजवताना त्यात हळदीची पावडर आणि त्यायृत शेंगदाण्याच्या तेलाचे काही थेंब टाका. यामुळे डाळ पटकन शिजते आणि एक वेगळा स्वाद पण येतो.
  • बदाम जर १० ते १५ मिनिटे गरम पाण्यात भिजत ठेवल्यास बदामाची साले चटकन निघण्यास मदत होते.
  • लसूणच्या पाकळ्या थोड्या गरम केल्यास त्याची साले पटकन निघतात.
  • जास्त लिंबाच्या रसासाठी लिंबू कोमट पाण्यात भिजवावे.
  • सुक खोबर तुरडाळीत ठेवल तर खोबर खराब होत नाही.
  • तांदूळ पाण्यात भिजवून ठेवल्यास तांदळाचा दाणा मोठा आणि मोकळा होतो.
  • बटाटे झटपट उकडण्याकरता बटाट्यामध्ये चिमुटभर हळद घालावी.
  • तुरीच्या डाळीत हिंग ठेवल्यास हिंगाचा स्वाद टिकून राहतो.
  • डाळ किंवा तांदळामध्ये कडूनिंब घातल्यास त्याला किड लागत नाही.
  • भाज्यांमध्ये शेवटी मीठ घातल्यास भाजीतलं लोह टिकून राहते.

    वाचा – आरोग्यदायी तांब्याच्या भांड्यातील पाणी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -