घरक्रीडासुनील गावस्कर यांच्या नावे वानखेडे स्टेडिअमचा 'हॉस्पिटॅलिटी बॉक्स'

सुनील गावस्कर यांच्या नावे वानखेडे स्टेडिअमचा ‘हॉस्पिटॅलिटी बॉक्स’

Subscribe

मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricker Association) तर्फे २९ ऑक्टोबर रोजी वानखेडे स्टेडिअमचा ‘हॉस्पिटॅलिटी बॅाक्स’ लिटल मास्टर सुनील गावसकर यांच्या नावे करण्यात येणार येणार आहे. शनिवारी झालेल्या एमसीएच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याच प्रसंगी ‘दिलीप वेंगसरकर नॅार्थ स्टँड’ चे देखील यादिवशी उद्घाटन करण्यात येईल.

मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून हॉस्पिटॅलिटी बॅाक्स सुनील गावसकर यांच्या नावे सुपूर्द करेल, असे अॅपेक्स काऊन्सिलच्या सदस्याने पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. दिलीप वेंगसरकर नॉर्थ स्टँड” चे उद्घाटन हे कार्यक्रमाचे मुख्य अतिथी शरद पवार यांच्या हस्ते होईल. तर जी आर विश्वनाथन यांचीही कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असेल. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुनिल गावसकर आणि दिलीप वेंगसरकर या दोघांनाही मुंबई क्रिकेट असोसिएशन तर्फे सन्मानित केले जाणार आहे.

- Advertisement -

भारताचा माजी कर्णधार सुनिल गावस्करने तब्बल १२५ कसोटी सामने खेळले आहेत. आपल्या संपुर्ण करिअरमध्ये गावस्कर यांनी १० हजार १२२ धावा केल्या. लिटल-मास्टरने एकुण १०८ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळले आहेत. या सामन्यात त्यांनी २ हजार ९२ धावा केल्या आहेत. भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष वेंगसरकर यांनी ११६ कसोटी सामने खेळले आहेत. त्यांनी या सामन्यातून ६,८६८ धावा केल्या आहेत. तसेच ते लॉर्ड ऑफ लॉर्ड्स म्हणून देखील ओळखले जातात. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पदाधिकारी म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे.


हेही वाचा – IPL 2021 : DC vs CSK सामन्यानंतर ऑरेंज, पर्पल कॅपमध्ये फेरबदल

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -