घरक्रीडाT20 World Cup 2021: ind vs pak जो संघ सामना जिंकेल, ५०...

T20 World Cup 2021: ind vs pak जो संघ सामना जिंकेल, ५० टक्के…, इंझमाम उल हकची प्रतिक्रिया

Subscribe

पाकिस्तानच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार इंझमाम उल हकने विराट सेनेचे कौतुक करत यंदाच्या टी २० विश्व चषकामध्ये भारतीय संघ सर्वाधिक पसंतीचा असल्याचे म्हटले आहे. यंदाच्या विश्व चषकासाटी ओमान आणि युएईमध्ये भारतीय संघासाठी अनुकुल असे वातावरण असल्यानेच भारतीय संघाची जेतेपदाची शक्यता अधिक असल्याचे इंजमामने म्हटले आहे. इंझमामने यंदाच्या मालिकेत भारतीय संघाच्या कामगिरीवर भाष्य करतानाचा एक यूट्युब व्हिडिओ शेअर केला आहे. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघादरम्यान जेव्हा सामना असतो, तेव्हा कामगिरीबाबतचा दबाव यावरही इंझमामने भाष्य केले आहे.

एखाद्या मालिकेत कोणालाच कोणता संघ जिंकेल याबाबतचे भाकीत वर्तवता येत नाही. पण एखाद्या संघाला सामना जिंकायची किती शक्यता असते हे संघाच्या कामगिरीवर अवलंबून असते. माझ्या मते भारताला हा विश्वचषक जिंकण्याची शक्यता आहे. महत्वाचे म्हणजे याठिकाणची खेळपट्टी हेच कारण आहे. तसेच भारतीय संघाकडे अनुभवी असे खेळाडूही आहेत, असेही इंझमामने युट्यूब चॅनेलवर स्पष्ट केले.

- Advertisement -

भारत या मालिकेचे आयोजन करणारा देश होता. पण काही कारणास्तव ही मालिका आता युएई आणि ओमानला खेळावी लागत आहे. भारतातील कोरोनाच्या परिस्थितीमुळेच हे सामने ओमान आणि दुबईमध्ये खेळण्याची वेळ आली आहे. भारताकडे सध्या असलेला संघ पाहता, भारताला सुपर १२ स्टेजमध्ये जाण्यासाठीची तसेच टी २० वर्ल्ड कप जिंकण्याची संधी आहे. त्यामध्ये इंग्ल्डं आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या सराव सामन्यांमुळे त्यांची तयारी अधिक चांगली होईल असे अपेक्षित आहे.

ऑस्ट्रेलियाविरोधातील सामना पाहिला तर १५६ धावांचा पाठिंबा करताना विराट कोहलीला बॅटिंग करण्याची वेळही आली नाही. उपखंडातील युएई आणि ओमानसारख्या खेळपट्ट्यांवर भारतीय संघ हा टी २० मालिकेतील सर्वात डेंजरस संघ आहे. इतक्या धावांचा पाठलाग भारतीयांनी सहज केला, असेही इंझमाम म्हणाला. भारतीय संघाचा सामना यंदाच्या मालिकेत येत्या दिवसात रविवारी होणाऱ्या सामन्यात होणार आहे. दुबईत खेळला जाणारा सामना हा हाय वोल्टेज सामना असणार आहे. महत्वाचे म्हणजे अनेकदा भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील सामन्यांमध्ये हा सामना म्हणजे फायनलच्या आधीची फायनल असते.

- Advertisement -

यंदाच्या सुपर १२ सामन्यातील भारत विरूद्ध पाकिस्तान हा सामना फायनलच्या आधीची फायनल असणार आहे. याआधी २०१७ मध्ये चॅम्पिअन्स ट्रॉफीमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान अशी लढत झाली. त्यानंतर अंतिम सामन्यातही भारत विरूद्ध पाकिस्तान लढत पहायला मिळाली होती. हा सामना जो जिंकणार त्या संघावरील ५० टक्के प्रेशर आधीच कमी होईल. तसेच विजेत्या संघाचे मनोबलही वाढते.


हेही वाचा – T20 WC : भारत-पाकिस्तान टी२० वर्ल्ड कपचा निकाल सर्वांना आधीच माहितेय – वीरेंद्र सेहवाग

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -