घरताज्या घडामोडीमाधुरी दीक्षितचा मुक्काम आता अप्पर वरळीत, लक्झरी फ्लॅटच्या भाड्यासाठी मोजणार कोट्यावधी

माधुरी दीक्षितचा मुक्काम आता अप्पर वरळीत, लक्झरी फ्लॅटच्या भाड्यासाठी मोजणार कोट्यावधी

Subscribe

बॉलिवुडमध्ये एक काळ गाजवणाऱ्या माधुरी दीक्षितचा क्रेझ आजही तसाच कायम आहे. इतक्या वर्षांच्या बॉलिवुडच्या करिअरनंतरही माधुरीने तिची सेलिब्रिटी इमेज कायमच जपली आहे. तिच्या स्क्रिन पलीकडच्या जगतातही ही या गोष्टीची खबरदारी घेत असते. त्यामुळेच मुंबईतील नवीन रेसिडेंशिअल हब म्हणून उदयास आलेल्या अप्पर वरळीत आता माधुरीचा आगामी तीन वर्षातील मुक्काम असणार आहे. मुंबईतील लोअर परळ भागातील अप्पर वरळी हा दक्षिण मुंबई पाठोपाठ सर्वाधिक पसंतीचा रहिवासासाठीचा भाग म्हणून गेल्या काही वर्षात उदयास आला आहे. माधुरीनेही जमान्यासोबत जाताना आपला नवा पत्ता आता अप्पर वरळीतला निश्चित केला आहे. पण माधुरीने घर खरेदी न करता अप्पर वरळीत फ्लॅट भाडेतत्वावर घेतला आहे. माधुरीचे हे घर भाड्याने घेण्यासाठीचे खास असे कारणही आहे.

माधुरी दीक्षितने आठव्याभरापूर्वीच मुंबईतील एक फ्लॅट भाड्याने घेतला आहे. अनेक मुंबईकरांना वर्षाचा पगारही नसेल इतके भाडे महिन्यापोटी माधुरी मोजत आहे. माधुरीने इंडियाबुल्स ब्लू येथे २९ व्या माळ्यावर फ्लॅट भाड्याने घेतला आहे. आगामी तीन वर्षांसाठीचा भाडेकरार माधुरीने या फ्लॅटसाठी केला आहे. प्रत्येक वर्षानंतर या भाड्यामध्ये वाढ होणार आहे हे विशेष. माधुरीने भाड्याने घेतलेला फ्लॅट हा अप्पर वरळीत म्हणजे लोअर परळ भागातील आहे. महत्वाचे म्हणजे या फ्लॅटसोबतच पाच कव्हर्ड पार्किंगची सुविधाही आहे.

- Advertisement -

झॅपकीने दिलेल्या माहितीनुसार माधुरीने या फ्लॅटसाठी ३ कोटी रूपये अनामत रक्कम मोजली आहे. माधुरीने तीन वर्षांसाठी भाड्याने घेतलेल्या घरासाठी पहिल्या १२ महिन्यांसाठी १२.५ लाख रूपये इतके महिन्यापोटीचे भाडे आहे. तर पुढच्या १२ महिन्यासाठी १३.१२ लाख इतके भाडे आहे. शेवटच्या म्हणजे तिसऱ्या वर्षासाठी माधुरी १३.७८ लाख रूपये भाडे मोजणार आहे. वर्षापोटी ५ टक्के या दराने या भाड्यामध्ये वाढ होणार आहे. या फ्लॅटचे मालक काजल फॅबियानी आहेत.

याआधी विराट कोहलीनेही मुंबईतील वरळी भागातील आपले घर हे १५ लाख रूपये महिना या किंमतीने भाडे तत्वावर दिले आहे. त्याआधी २०२० मध्ये ह्रतिक रोशनने ८.२५ लाख रूपये महिना इतके भाडे आपल्या रूमसाठी आकारले होते.

- Advertisement -

कसे आहे माधुरीचे घर ?

माधुरीचे अप्पर वरळीतील घर हे संपुर्ण काचेच्या टॉवरमधील आहे. एकुण ३०० अपार्टमेंट्सचा ही ग्लास फसॅडची बिल्डिंग आहे. या टॉवरमध्ये २ बीएचके ते चार बीएचके असे फ्लॅट्स आहेत. या फ्लॅट्सची किंमत साधारणपणे ४.५ कोटी रूपये ते १५ कोटी रूपये इतकी आहे. इंडियाबुल्स टॉवरमधील काही मजले हे राना कपूर यांचे होते. साधारणपणे ५ हजार ते ६ हजार चौरस फूट या क्षेत्रातील हे टॉवर्स आहेत. प्रत्येक चौरस फुटासाठी रहिवाशांच्या घराची किंमत ही ७० हजार रूपये इतकी आहे.

india bulls blue tower C

साधारणपणे ५ हजार ते ६ हजार चौरस फूट या क्षेत्रातील हे टॉवर्स आहेत. प्रत्येक चौरस फुटासाठी रहिवाशांच्या घराची किंमत ही ७० हजार रूपये इतकी आहे.

indiabulls blue

 


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -