घरक्रीडाIPL 2022 Auction : कर्णधार मॉर्गनचा KKR मधून पत्ता कट; संघ आता...

IPL 2022 Auction : कर्णधार मॉर्गनचा KKR मधून पत्ता कट; संघ आता नवीन लीडरच्या शोधात

Subscribe

केकेआरच्या फँचायझीने इऑन मॉर्गन, दिनेश कार्तिक, शुभमन गिल यांसारख्या खेळांडूना रिलीज केले तर संघासाठी नवा कर्णधार शोधण्याची गरज असणार आहे

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२२ च्या हंगामासाठी लिलाव प्रक्रिया होणार आहे. त्यामुळे सर्व संघांनी ३० नोव्हेंबर म्हणजेच मंगळवार पर्यंत संघात कायम ठेवलेल्या खेळाडूंची यादी बीसीसीआयकडे सादर करायची आहे. माहितीनुसार केकेआरच्या संघाने संघाचा कर्णधार मॉर्गनला रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. जानेवारी मध्ये लिलाव प्रक्रिया पार पडणार आहे. जुने ८ संघ जास्तीत जास्त ४ खेळाडूंना रिटेन करू शकतात. त्यामध्ये ३ पेक्षा जास्त भारतीय किंवा २ पेक्षा जास्त विदेशी खेळाडूंचा समावेश असू शकत नाही. केकेआरचा संघ सुनिल नरेन, आंद्रे रसल, वरूण चक्रवर्ती आणि व्यंकटेश अय्यर या ४ खेळांडूना रिटेन करण्याची शक्यता आहे. म्हणजेच केकेआरचा संघ रिटेशन करताना ४२ कोटी रूपयांचा वापर करण्यासाठी तयार आहे.

अशातच जर केकेआरच्या फँचायझीने इऑन मॉर्गन, दिनेश कार्तिक, शुभमन गिल यांसारख्या खेळांडूना रिलीज केले तर संघासाठी नवा कर्णधार शोधण्याची गरज असणार आहे. कर्णधार इऑन मॉर्गनचे आयपीएल २०२१ मधील प्रदर्शने खास राहिले नव्हते. २०२१ च्या आयपीएलच्या १४ व्या हंगामात केकेआरची सुरूवातीपासूनच कामगिरी निराशाजनक राहिली होती. लक्षणीय बाब म्हणजे तरीदेखील केकेआरने पात्रता फेरीत प्रवेश मिळवला होता. त्यामुळेच मॉर्गनचे केकेआरमधील स्थान अडचणीत आले होते.

- Advertisement -

२०२१ च्या हंगामात मॉर्गनने एकूण १७ सामने खेळले आणि फक्त १३३ धावा केल्या होत्या. पूर्ण हंगामात मॉर्गनने ६ षटकार मारले होते.

लक्षणीय बाब म्हणजे केकेआर सोबत काही अन्य संघाना देखील १५ व्या हंगामात नवीन कर्णधाराची गरज असणार आहे. लखनऊ आणि अहमदाबाद हे नवीन संघ आहेत. त्यांना कर्णधारासोबत पूर्ण संघाची आवश्यकता आहे. तर विराट कोहलीने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे कर्णधारपद सोडले आहे. अशातच आरसीबीला देखील नवीन कर्णधाराची गरज असणार आहे.

- Advertisement -

हे ही वाचा: http://ICC WTC Point Table : कानपूरमधील ड्रॉ सामन्याचा भारताला झटका; कसोटी चॅम्पियनशिपच्या क्रमवारीत भारताच्या वरचढ पाकिस्तान


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -