घरक्रीडाRohit Sharma : हिटमॅन कर्णधार झाल्याने 'या' खेळाडूच्या आशा पल्लवीत; विराटच्या नेतृत्वात...

Rohit Sharma : हिटमॅन कर्णधार झाल्याने ‘या’ खेळाडूच्या आशा पल्लवीत; विराटच्या नेतृत्वात नव्हती संधी

Subscribe

भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज रोहित शर्माकडे टी-२० नंतर एकदिवसीय सामन्यांच्याही कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे

भारतीय संघाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज रोहित शर्माकडे टी-२० नंतर एकदिवसीय सामन्यांच्याही कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. त्यामुळे आता विराट कोहलीकडे फक्त कसोटी संघाचे कर्णधारपद असणार आहे. दरम्यान इतर कर्णधारांप्रमाणेच रोहितही संघात काही खास खेळाडूंना संधी देऊ शकतो. अशातच असे काही खेळाडू आहेत त्यांच्या रोहित कर्णधार झाल्यामुळे संघात पुनरागमन होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर त्याचा खास मित्र आणि दिर्घ कालावधीपर्यंत त्याच्या सोबत सलामीवीर म्हणून खेळलेल्या शिखर धवनसाठी एक संधी असण्याची चिन्हं आहेत.

शिखर धवन प्रत्येक मालिकेत रोहितसोबत भारताच्या डावाची सुरूवात करत होता. मात्र मध्यंतरी त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि कोहलीच्या कर्णधारपदात धवनच्या जागेवर के.एल राहुलला सलीमीचा फलंदाज म्हणून संधी देण्यात आली होती. लक्षणीय बाब म्हणजे राहुलने मधल्या फळीतील फलंदाज म्हणून अधिक चांगली कामगिरी केली आहे आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांत विकेटकिपरच्या भूमिकेतही तो फिट असल्याचे पहायला मिळाले आहे. त्यामुळे रोहित पुन्हा एकदा सलामीवीर धवनचे पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, आताच्या घडीला रोहित शर्मा सोबत धवनची नसून राहुलची जोडी अधिक प्रभावशाली ठरत आहे. इंग्लंडविरूध्दच्या कसोटी मालिकेनंतर टी-२० विश्वचषक आणि न्यूझीलंडसोबतच्या मालिकेत या दोन्हीही फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली होती. रोहित आणि राहुल याच्यांत सामन्यादरम्यान चांगला ताळमेळ असतो आणि ते दोघेही एकमेकांना चांगल्या पध्दतीने समजतात. मात्र काही महिन्यांपूर्वी असाच ताळमेळ रोहित आणि धवनमध्ये पहायला मिळत होता. पण सध्याची परिस्थिती पाहता धवनसाठी संघात पुनरागमन करणे फार कठीण असल्याचे दिसत आहे.


हे ही वाचा: http://ENG vs AUS Ashes Series : स्टोक्सने ५ षटकांत टाकले १४ नो बॉल; तिसऱ्या अंपायरनेही केले दुर्लक्ष

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -