घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांकडून राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा

मुख्यमंत्र्यांकडून राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा

Subscribe

गेल्या कित्येक दिवसांपासून विरोध पक्षांकडून राज्यात दुष्काळ जाहिर करण्याची मागणी केली जात होती. आज अखेर मुख्यमंत्र्यांनी राज्यात दुष्काळसदृष परिस्थितीची घोषणा केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १८० तालुक्यांमध्ये दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा केली आहे. आज राज्यमंत्री मंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. त्यानुसार आता सरकार उपायोजना करणार असून या १८० तालुक्यांमध्ये आठ उपाययोजना राबवणार आहे. या दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी केंद्र सरकारचे पथक करणार आहे. आणि त्यानंतर मदतीची घोषणा करण्यात येणार आहे. सरकारच्या आठ उपाययोजनेमध्ये टॅंकर, चारा, वीज, विद्यार्थ्यांना शिक्षण, चारा छावण्या यांचा समावेश आहे.

- Advertisement -

विरोधी पक्षांकडून सतत दुष्काळ जाहिर करण्याची मागणी

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षांकडूनही राज्यात दुष्काळ जाहिर करावा, अशी मागणी सुरु होती. सत्तेतील भाजपचाच मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेने दुष्काळ जाहिर करावा यासाठी रस्त्यावर उतरुन आंदोलन करण्याचा इशारा केला होता. अखेर विरोधी पक्षांच्या मागणीनंतर आज मुख्यमंत्र्यांनी राज्यात दृष्काळसदृश परिस्थितीची घोषणा केली आहे.

दुष्काळसदृश परिस्थिती घोषित झालेले तालुक्यांची यादी 

letter of drought committee
राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीचे पत्र
list of drought district
दुष्काळसदृश जाहिर झालेल्या तालुक्यांची यादी

 

- Advertisement -
list of drought distric
दुष्काळसदृषश जाहिर झालेल्या तालुक्यांची यादी

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -