घरमहाराष्ट्र२०१९ मध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही - शरद पवार

२०१९ मध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नाही – शरद पवार

Subscribe

आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे समर्थन करत नाही. शिवाय, मोदींचे व्यक्तिमत्व हे भाजप नेते अटलबिहारी वाजपेयींप्रमाणे नाही, असे प्रतिपादन शरद पवार यांनी केले.

२०१९ मध्ये कुठल्याच पक्षाला बहुमत मिळणार नसल्याचे शरद पवार यांनी सांगितले आहे. ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीच्या मुंबई मंथन कार्यक्रमात ते बोलत होते. २०१९ मध्ये मोदी सरकारची सत्ता येणार नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिवाय, येत्या निवडणुकीत कुणालाही बहुमत मिळणार नसून २००४ सारखी परिस्थिती देशात उद्भवणार आहे, असं देखील ते म्हणाले.

‘भाजपला संपवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र यायला हवेत’

शरद पवार यांनी सांगितले की, ‘आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे समर्थन करणार नाही. शिवाय, मोदींचे व्यक्तिमत्व हे भाजप नेते अटलबिहारी वाजपेयींप्रमाणे नाही. लोकांनाही आता सत्तेमध्ये बदल हवा आहे. त्यामुळे आता येत्या निवडणुकीत भाजप किंवा मोदी सरकार निवडून येणार नाही. त्याचबरोबर मोदी सरकार किंवा भाजपला संपवण्यासाठी सर्व पक्षीयांनी एकत्र येणे गरजेचे आहे. शिवाय, भाजपनेही कुणाची न कुणाची साथ घेतली आहे. त्यामुळे महायुती होणं गरजेचे आहे’. त्याचबरोबर राजकारणात युतीनेच देश चालतो, असं देखील पवार म्हणाले.

- Advertisement -

‘राफेल विषयावर जास्त बोलू शकत नाही’

राफेल विमानावर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना पवार म्हणाले की, ‘मीडियामध्ये जागा भरण्यासाठी आपल्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. खरंतर राफेल विमानाची आपण स्वत: पाहणी केली आहे. राफेल हे खरंच छान विमान आहे. परंतु, त्याच्या किंमतीवरुन लोकांच्या मनात संशय आहे आणि तो एक संवेदनशील विषय आहे, त्यामुळे आपण यावर फार काही बोलणार नाहीत’, असं शरद पवार म्हणाले आहेत.


हेही वाचा – मुख्यमंत्र्यांकडून राज्यात दुष्काळसदृश परिस्थितीची घोषणा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -