घरक्रीडाYo Yo Test in Cricket : ८ मिनिटात २ किमी धावला नाही...

Yo Yo Test in Cricket : ८ मिनिटात २ किमी धावला नाही तर पगार होणार कट; श्रीलंका बोर्डाची क्रिकेटपटूंवर कडक कारवाई

Subscribe

आताच्या घडीला क्रिकेट पूर्णपणे बदलत चालले आहे गोलंदाजी आणि फलंदाजी व्यतिरिक्त खेळाडूंच्या फिटनेसलाही खूप महत्त्व आहे

आताच्या घडीला क्रिकेट पूर्णपणे बदलत चालले आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी व्यतिरिक्त खेळाडूंच्या फिटनेसलाही खूप महत्त्व आहे. याबाबतीतच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एक कठोर निर्णय घेतला असून आता खेळाडूंना अशाप्रकारेच यो-यो कसोटी सामने खेळावे लागतील. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने सर्व क्रिकेटपटूंना नव्या वर्षापासून फिटनेसबाबत नवे नियम लागू केले आहेत. लक्षणीय बाब म्हणजे मार्गदर्शक तत्त्वांनुसार खेळाडू फिट न आढळल्यास त्यांचा पगारही कापला जाऊ शकतो. मार्गदर्शक तत्त्वांत म्हटले की जर कोणता खेळाडू ८.३५ मिनिट ते ८.५५ मिनिटांमध्ये २ किमी धावत असेल तर नियमांनुसार त्याचा पगार कापला जाऊ शकतो.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने यो-यो कसोटीमध्ये २ किलोमीटर धावण्यावर नियम बनवले आहेत. यामध्ये जर कोणता खेळाडू २ किमी धावण्यासाठी ८.५५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ घेत असेल तर त्याची संघात निवड केली जाणार नाही. ८.३५ मिनिट ते ८.५५ मिनिटांवर त्याचा पगार कापला जाईल. मात्र या खेळाडूंचा संघात समावेश केला जाऊ शकतो. दरम्यान, जर कोणता खेळाडू २ किमी धावण्यासाठी ८.१० मिनिटांपेक्षा कमी वेळ घेत असेल तर त्याचा संघात समावेश केला जाईल. हा संघात समाविष्ट होण्यासाठी नवीन कडक नियम असणार आहे. तर पहिली फिटनेस चाचणी ७ जानेवारी २०२२ ला होणार आहे. ज्यामध्ये करारात समाविष्ट असलेल्या सर्व खेळाडूंना सहभागी व्हावे लागेल. याशिवाय महिन्याच्या कोणत्याही वेळीही चाचणी केली जाऊ शकते.

- Advertisement -

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच श्रीलंका क्रिकेट बोर्डाने दिग्गज महेला जयवर्धनेची संघाच्या सल्लागार पदी नियुक्ती केली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाचे प्रशिक्षक पद सांभाळणाऱ्या जयवर्धने आता आपल्या देशातील संघात बदल करण्यास सुरूवात केली आहे.


हे ही वाचा: http://Ashes 2021 AUS vs ENG : कांगारूच्या संघासमोर इंग्लिश संघ गारद; पिंक-बॉल कसोटीत ऑस्ट्रेलियाचा मोठा विजय

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -