घरताज्या घडामोडीOmicron Variant : अमेरिकेकडून ३८०० फ्लाईट्स रद्द, दुबईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन...

Omicron Variant : अमेरिकेकडून ३८०० फ्लाईट्स रद्द, दुबईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन सक्तीचे

Subscribe

संपूर्ण जगभरात कोरोनानंतर आता ऑमिक्रॉन व्हेरियंटने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये ऑमिक्रॉनचा सर्वात पहिला रूग्ण आढळून आला. ऑमिक्रॉनने दक्षिण आफ्रिकेपासून ते थेट भारतापर्यंत शिरकाव केला आहे. अमेरिकेने जवळपास ३८०० फ्लाईट्स रद्द केल्या आहेत. तसेच दुबईतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे.

ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला अमेरिकेत ३८०० पेक्षा अधिक फ्लाईट्स रद्द करण्यात आले आहेत. अमेरिका आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान प्रवास पुन्हा एकदा सुरू होणार आहे, अशी माहिती व्हाईट हाऊसकडून देण्यात आली आहे. यूनायटेड एयरलाईन्सने काल(शु्क्रवार) १७६ आंतरराष्ट्रीय विमानं रद्द केली आहेत.

- Advertisement -

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध

दुबईहून मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रवाशांसाठी सात दिवस क्वारंटाईन सक्तीचे करण्यात आले आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर निर्बंध घालण्यासाठी राज्य सरकारने आणि महापालिकेकडून प्रशासनाने नियमावली जारी केली आहे. दुबईत येणारे प्रवासी मुंबईतील असल्यास त्यांना होम क्वारंटाईन करण्यात येणार आहे. तर त्यांची सातव्या दिवशी आरटीपीसीआर चाचणी देखील केली जाणार असल्याची महिती पालिकेने दिली आहे.

- Advertisement -

दुबईतून येणाऱ्या प्रवाशांवरही प्रशासनाचे लक्ष

भारताने ओमिक्रॉनचा धोका असलेल्या १२ देशांची नावे जाहीर केली आहेत. या १२ देशातील प्रवासी अनेकदा दुबईमार्गे आपल्या पुढील प्रवासाला जात असतात. त्यामुळे दुबई विमानतळावर अनेक देशातील प्रवासी आणि इतर लोकांचा संपर्क होतो. त्यामुळे दुबईतून येणाऱ्या प्रवाशांवरही प्रशासनाचे लक्ष असणार आहे. ओमिक्रॉनची लागण झाल्यानंतर रूग्ण आजारी पडण्याची शक्यता ०.३७ टक्के इतकी आहे. तर मृ्त्यूचा धोका ०.५ टक्के इतका आहे.


हेही वाचा : Nitesh Rane: ‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते!’, मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचे ट्विटमधूनच प्रत्युत्तर


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -