घरक्राइमबुटांवरून गाठला दरोडेखोर; CCTV फुटेजवरून SBI बँक दरोड्याचा उलगडा

बुटांवरून गाठला दरोडेखोर; CCTV फुटेजवरून SBI बँक दरोड्याचा उलगडा

Subscribe

मुंबईतील दहिसर पश्चिम येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत बुधवारी भरदिवसा गोळीबार करून अडीज लाख रुपयांची लूट करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी २ दरोडेखोरांच्या २४ तासात मुसक्या आवळल्या आहेत.

भरदिवसा बँकेत झालेल्या या दरोड्यात एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहेत तर एक कर्मचारी गंभीर जखमी झाला आहे. दरोडेखोरांनी अगदी फिल्म स्टाईलने बँकेत एन्ट्री घेत गोळीबार केला. यावेळी २.३० लाखांची रोकड घेऊन हे दरोडेखोर पळून गेले. याप्रकरणी एमएचबी पोलिसांनी तपास सुरु केला असून घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती आले आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये या घटनेचा थरार कैद झाला आहे. दरम्यान मुंबई पोलिसांची टीम तसेच मुंबई क्राइम ब्रान्चची ८ पथकं या प्रकरणाचा तपास घेत आहेत.

- Advertisement -

बुटांमुळे लागला दरोडेखोरांचा शोध

तपास यंत्रणांना तपासादरम्यान बँकेच्या आवारात दोन दरोडेखोरांपैकी एकाचा बूट सापडला आहे. या बुटांच्या वासामुळे मुंबई पोलिसांच्या श्वान पथकाने दरोडेखोरांचा माग काढत दरोडेखोर लपून बसलेल्या घराचा शोध घेता आला.

यावेळी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तातडीने त्या घराचा ताबा घेत दार उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दार आतून घट्ट बंद होते. यावेळी आतून कोणी दरवाजा उघडत नसल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला आणि पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांनी हे दार तोडून आत प्रवेश केला. यावेळी दोन आरोपींपैकी एक जण घरात लपून बसला होता.

- Advertisement -

पोलिसांनी जागेवरच त्याच्या मुसक्या आवळल्या. यानंतर त्याच परिसरात लपून बसलेल्या दुसऱ्या दरोडेखोराला अटक करण्यात आली आहे. विकास यादव आणि धर्मेंद्र यादव असे या दोघांची नावे असून दोघे सख्खे भाऊ असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

मात्र मुंबईत गेल्या काही दिवसांपासून बँका आणि दुकांनांवर दिवसाढवळ्या दरोडा टाकण्याच्या घटना सातत्याने वाढत आहे. यामुळे अशा दरोडेखोरांना रोखण्याचे आव्हान आता मुंबई पोलिसांसमोर उभे राहिले आहे.


Omicron Variant : ओमिक्रॉनला रोखण्यासाठी लस अधिक प्रभावी, WHO वैज्ञानिकांचे मत

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -