घरताज्या घडामोडीमुंबईत १५ जानेवारीपर्यंत जमावबंदी; 'या'वेळेत चौपाटी, बागा, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी

मुंबईत १५ जानेवारीपर्यंत जमावबंदी; ‘या’वेळेत चौपाटी, बागा, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी

Subscribe

सध्या मुंबईकरांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत दुप्पटीने वाढ होत असून ओमिक्रॉनच्या रुग्ण देखील वेगाने वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर २०२१ला निरोप आणि नववर्षांचे स्वागत घरी राहून करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. मुंबईत ७ जानेवारी २०२२पर्यंत लागू करण्यात आलेली जमावबंदी आता १५ जानेवारी २०२२ पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच संध्याकाळी ५ ते पहाटे ५ वाजेपर्यंत चौपाटी, बागा, सार्वजनिक ठिकाणी जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. याबाबतीच माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.

- Advertisement -

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील म्हणाले की, ३१ डिसेंबरच्या अनुषंगाने कोणीही कशाही प्रकारे पॅनिक होण्याची आवश्यकता नाही. मुंबई पोलिसांनी खूप सविस्तरपणे बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. त्यात गर्दीचे नियमन, टार्फिकचे नियमन आणि घातपाताविरोधातील सर्व मेजर्स योग्य पद्धतीने घेतले जाणार आहे. त्याचबरोबर नवीन कोविडच्या गाईडलाईन्स आल्या आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी महानगरपालिकेबरोबरच मुंबई पोलिसांचे पथक कार्यरत राहणार आहेत. लोकांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मेसेज पोहोचेल, यासाठी व्यवस्थित संपर्क साधण्यात आला आहे. सर्व यंत्रणांना सार्वजनिक ठिकाणी लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. जास्त गर्दी न करता नववर्ष साजरे करायचे आहे.

दरम्यान मुंबईत काल, गुरुवारी ३ हजार ६७१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून एकही रुग्णाच्या मृत्यू नोंद झाली नाही. तसेच ३७१ बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईतील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७ कोटी ७९ लाख ४७९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १६ हजार ३७५ जणांचा मृत्यू झाला असून ७ लाख ४९ हजार १५९ रुग्ण रिकव्हर झाले आहे. सध्या मुंबईत ११ हजार ३६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एकाबाजूला मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या दुप्पटीने वाढत असून दुसऱ्याबाजूला ओमिक्रॉनची संख्या झपाट्याने वाढत आहे. राज्यात काल १९७ ओमिक्रॉनबाधित नोंद झाली. त्यापैकी १९० रुग्ण हे एकट्या मुंबईतले होते.

- Advertisement -

हेही वाचा – Omicron Symptom: सावधान! त्वचेवर दिसणारी ‘ही’ लक्षणे असू शकतात ओमिक्रॉनची


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -